Asian Games 2023: आशियाई क्रीडा स्पर्धेत अन्नू राणीने पटकावलं सुवर्ण पदक

तेजस्वीन शंकरला डेकॅथलॉनमध्ये रौप्य पदक

266
Asian Games 2023: आशियाई क्रीडा स्पर्धेत अन्नू राणीने पटकावलं सुवर्ण पदक
Asian Games 2023: आशियाई क्रीडा स्पर्धेत अन्नू राणीने पटकावलं सुवर्ण पदक

भारताची भालाफेक खेळाडू अन्नू राणीने  (Annu Rani) चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games 2023) इतिहास रचला आहे. तिने एशियाडमधील महिलांच्या भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं आहे. क्रीडा स्पर्धेच्या १०व्या दिवशी भारताच्या खेळाडूंनी मैदान गाजवले.

श्रीलंकेच्या नदीशा दिलहानने रौप्यपदक जिंकले आहे. अन्नू राणीने चौथ्या प्रयत्नात सर्वोत्तम कामगिरी करत ६२.९२ मीटर लांब भाला फेकला. शेवटपर्यंत इतर कोणत्याही प्रतिस्पर्ध्याला हे अंतर पार करता आले नाही. अखेर भारताच्या १५व्या सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले. १०व्या दिवसातील हे भारताचे दुसरे सुवर्णपदक ठरले. या पदकासह भारताची पदकसंख्या ६९पर्यंत पोहोचली. या पदकासह भारताची पदक संख्या ६९ पर्यंत पोहोचली आहे. १५ गोल्ड, २६ सिल्व्हर, २८ कास्य पदकांचा समावेश आहे.

या स्पर्धेत भारताला पहिल्या दिवशी पाच, दुसऱ्या दिवशी सहा, तिसऱ्या दिवशी तीन, चौथ्या दिवशी आठ, पाचव्या दिवशी तीन, सहाव्या दिवशी आठ, आठव्या आणि नवव्या दिवशी सात-सात पदके मिळाली, तर १०व्या दिवशी ९ पदकांची कमाई करण्यात खेळाडूंना यश आले.

तेजस्वीन शंकरला डेकॅथलॉनमध्ये रौप्य पदक
भारताच्या तेजस्वीन शंकरने डेकॅथलॉनमध्ये रौप्य पदक जिंकले आहे. या स्पर्धेत १० विविध खेळ खेळले जातात. ही स्पर्धा दोन दिवस चालणार आहे. या स्पर्धेत १९७४मध्ये विजयसिंह चौहानने सुवर्ण आणि सुरेश बाबूने कास्य पदक जिंकले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.