राज्यामध्ये काही विशेष पक्ष, गट आणि त्यांचे विशेष नेते हे महाराष्ट्रातील जाती जातीमधला संवाद बिघडवून विसंवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी काही पक्ष, काही गट आणि काही नेते आणि काही गटाचे नेते हे राज्यातलं जातीय सलोख्याचं वातावरण बिघडवण्याचा, तर प्रयत्न करत नाहीत ना याची माहितीसुद्धा आजच्या कार्यकारणीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड.आशिष शेलार (Adv. Ashish Shelar) यांनी मंगळवारी येथे दिली.
दादर वसंत स्मृती येथे आज भाजपा महाराष्ट्र पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांची महत्त्वाची बैठक आज पार पडली. या बैठकीची सुरुवात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (State President Chandrasekhar Bawankule) यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीचे नियोजन डोळ्यासमोर ठेवून जे रचना केंद्र स्तरावर ठरले यासंबंधीचा मार्गदर्शन राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (National General Secretary Vinod Tawde) यांनी केले, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या भाषणाने या बैठकीचा समारोप करण्यात आला, असेही त्यांनी पत्रकारांना सांगितले.
(हेही वाचा – Crime : पिंपरी-चिंचवडमध्ये चार सराईत गुन्हेगारांकडून 5 पिस्तुल, 10 काडतूसे जप्त )
या बैठकीविषयी माहिती ॲड. शेलार यांनी माध्यमांना दिली. यावेळी पक्षाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, आदी यावेळी उपस्थित होते. देशातील महिलांना आरक्षण देणारे विधेयक मांडून ते लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर केल्याबद्दल आजच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानणारा ठराव मंजूर करण्यात आला. हा ठराव माधवी नाईक यांनी मांडला, तर चित्रा वाघ यांनी त्याला अनुमोदन दिल्याची माहितीही त्यांनी दिली.
राज्यांमध्ये महाविजय २०२४ हा एक विषय घेऊन आम्ही उतरलो असून यामध्ये ४५ प्लस लोकसभेच्या जागा आणि सध्याची राजकीय परिस्थिती आणि आपल्या भूमिका काय असल्या पाहिजेत त्याबद्दलचेही मार्गदर्शन करण्यात आले. समाजातील सलोखा बिघडवणारे पक्ष, गट आणि त्यांचे नेते यांना सडेतोड उत्तर महाराष्ट्रातील सर्व जनतेला बरोबर घेऊन नेण्याच्या दिशेने भाजपाची सुध्दा रचना लागते आहे याची योग्य माहिती योग्य वेळेला प्रदेशाध्यक्ष बावनकुळे देतील,असे सुतोवाचही ॲड. शेलार यांनी केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community