रानभाज्यांपैकी एक अळुची भाजी. या भाजीमध्ये आरोग्याला पोषक घटक असतात. फायबर, कार्बोहायड्रेट याशिवाय जीवनसत्त्व ए, सी, ई, बी ६, फोलेट तसेच मॅग्नेशियम, लोह, तांबे, जस्त, फॉस्फरस, पोटॅशियम आणि मँगनीज या गुणांनी समृद्ध आहे. त्यामुळे अनेक प्रकारचे आजार (Health Tips) अळुची भाजी खाल्ल्याने दूर होतात. जाणून घ्या –
अळूच्या पानांमध्ये हायपरटेनसीव्ह आहेत. त्यामुळे अळूच्या भाजीचे सेवन केल्यान रक्तदाबावर नियंत्रण येते.
अळूच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्याने त्याचे सेवन केल्यास पचनक्रिया सुधारायला मदत होते याशिवाय शरीराला ऊर्जा मिळून वजन कमी होण्यास मदत होते.
(हेही वाचा – Nana Patole : नाना पटोले यांची दिल्लीत पत काय?; सुनील तटकरेंनी डिवचले )
– अळूच्या पानांमधील बीटा कॅरोटिन असते. त्यामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारते. या भाजीतील ए जीवनसत्त्वामुळे हाडे मजबूत होतात.
– अशक्तपणा दूर होण्यासाठी अळूची भाजी खाणे फायदेशीर ठरते.