Cooking : चविष्ट आणि चटपटीत स्वयंपाकासाठी टीप्स

173

स्वयंपाक Cooking ही कला आहे आणि शास्त्रही. कोणी कितीही सुगरण असेल तरी कधीतरी अंदाज चुकतो आणि स्वयंपाक बिघडतो. अशावेळी काही सोप्या युक्त्या करून ते अन्न पुन्हा खाण्यास उपयुक्त करता येते. स्वयंपाकाचे काम सोपे करण्यासाठी जाणून घेऊया काही टीप्स.

  • पराठे चविष्ट बनविण्यासाठी कणकेत उकडलेला बटाटा किसून घाला.
  • पराठ्यांना तेलात किंवा तुपात शेकण्याऐवजी लोण्यात शेकले तर ते अधिक चविष्ट बनतात.
  • ग्रेव्ही दाट किंवा घट्ट करण्यासाठी त्यामध्ये सातू मिसळा. यामुळे ग्रेव्ही घट्ट होते आणि चविष्ट लागते.
  • भजी करताना त्या घोळात चिमूटभर आरारोट किंवा थोडं तेल गरम करून घालावं तर भजी कुरकुरीत आणि चवदार बनतील.
  • भजी करताना त्यावर चाट मसाला भुरभुरल्याने जास्त चविष्ट लागतात.
  • नूडल्स उकळताना उकळत्या पाण्यात थोडंसं मीठ आणि तेल घाला आणि काढल्यावर त्यांना थंड पाण्याने धुऊन घ्या. नूडल्स चिटकणार नाहीत मोकळे होतील.
  • रायता बनवताना त्यात हिंग-जिरे भाजून टाकण्याऐवजी हिंग-जिऱ्याची फोडणी द्यावी. रायते जास्त चविष्ट बनेल.
  • राजमा किंवा उडीद वरण करताना पाण्यात उकळताना मीठ टाकू नये. लवकर शिजेल. मीठ डाळ शिजल्यावर घाला.
  • पुऱ्या खमंग खुसखुशीत करण्यासाठी गव्हाचे पीठ लावताना त्यामध्ये एक चमचा रवा किंवा तांदळाचे पीठ घाला. पुऱ्या खुसखुशीत आणि खमंग बनतात.
  • गव्हाच्या पिठात एक लहान चमचा साखर टाकून पीठ लावल्याने पुऱ्या फुगतात.
  • पनीर जास्त घट्ट आणि कडक असल्यास चिमूटभर मिठाच्या कोमट पाण्यात १० मिनिटासाठी ठेवावं पनीर मऊ पडेल.
  • तांदूळ शिजवताना पाण्यात लिंबाचा रस टाकल्याने भात मोकळा, पांढरा आणि चविष्ट बनतविष्ट’ो.
  • कांदा परतताना त्यामध्ये थोडी साखर घातल्यानं कांदा लगेच तपकिरी होतो.
  • एक कप नारळाच्या पाण्यात दोन ब्रेड आणि एक चमचा साखर टाकून दळून घ्या.
    हे पीठ इडलीच्या घोळात टाकल्यानं खमीर चांगला येतो.
  • दही करताना आंबट नसल्यास, कोमट दुधात एक हिरवी मिरची टाकून ठेवल्यानं देखील दही तयार होतं.

(हेही वाचा Mangalyaan-2 Mission : इस्त्रोने केली नवीन घोषणा, मंगळावर जाण्याची तयारी सुरू)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.