Nupur Sharma : ‘सर तन से जुडा’चा नारा देणाऱ्या अजमेर दर्ग्याच्या चिश्तीला जामीन नाहीच, सुप्रीम कोर्टाने दिला हा निर्णय

भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या विरोधात घोषणाबाजी करणाऱ्या अजमेर दर्ग्याच्या मौलवींना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला नाही. न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला.

166
Nupur Sharma : 'सर तन से जुडा'चा नारा देणाऱ्या अजमेर दर्ग्याच्या चिश्तीला जामीन नाहीच, सुप्रीम कोर्टाने दिला हा निर्णय
Nupur Sharma : 'सर तन से जुडा'चा नारा देणाऱ्या अजमेर दर्ग्याच्या चिश्तीला जामीन नाहीच, सुप्रीम कोर्टाने दिला हा निर्णय

भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या विरोधात ‘सर तन से जुदा’चा नारा देणारे अजमेर दर्ग्याचे सय्यद हुसैन गौहर चिश्ती यांच्या जामीन अर्जावर ३ ऑक्टोबर रोजी सुनावणी झाली. (Nupur Sharma) या वेळी सुप्रीम कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा यांच्या खंडपीठाने आरोपीच्या जामीन अर्जावर विचार केला. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने अजमेर दर्गा मौलवी सय्यद हुसैन गौहर चिश्ती यांना जामीन देण्यास नकार दिला. चिश्ती सध्या तुरुंगात असून त्यांच्यावरील खटल्याच्या प्रतीक्षेत आहेत. न्यायालयाने या प्रकरणी आरोपी आणि राजस्थान सरकारचा युक्तिवाद ऐकून घेतला. या प्रकरणी राज्य सरकारची बाजू ज्येष्ठ विधिज्ञ मनीष सिंघवी यांनी सर्वोच्च न्यायालयात मांडली. (Nupur Sharma)

(हेही वाचा – Hair : कुरळ्या केसांना ठेवा चमकदार आणि सुंदर; वाचा ३ सोप्या टिप्स)

अजमेर दर्ग्यासाठी चिश्ती यांची याचिका

सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाची सुनावणी कनिष्ठ न्यायालयाला लवकरात लवकर घेण्याचे आदेश दिले. याशिवाय खटल्याच्या सुनावणीसाठी ६ महिन्यांची मुदतही निश्चित करण्यात आली होती. अजमेर दर्गा मौलवी सय्यद हुसैन गौहर चिश्ती यांनी गेल्या वर्षी दर्ग्याच्या आवारात भाजपच्या तत्कालीन प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्याविरुद्ध ‘सर तन से जुदा’ घोषणा देण्यास लोकांना सांगितले होते. (Nupur Sharma)

पोलिसांनी अटक केली होती

नुपूर शर्मा यांना जीवे मारण्याच्या धमक्या देणारा चिश्ती सय्यद हुसैन गौहर चिश्ती नंतर फरार झाला होता. राजस्थान सरकारने सुरुवातीला या प्रकरणी दिरंगाई केली; पण जेव्हा हे प्रकरण मीडियात आले, तेव्हा सरकारवर दबाव आणला गेला. यानंतर राजस्थान पोलिसांनी तात्काळ त्याच्या शोधासाठी छापेमारी सुरू केली. शेवटी छापा घालून चिश्ती यांना घरातून पकडून अटक करण्यात आली होती. सर तन से जुदा या घोषणेमुळे नंतर देशभरात द्वेषाचे वातावरण निर्माण झाले. अनेक हिंदूंच्या नाहक हत्या करण्यात आल्या. (Nupur Sharma)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.