ICC World Cup : सचिन तेंडुलकर विश्वचषकाचा ग्लोबल अ‍ॅम्बेसिडर

आगामी विश्वचषकाचा सलामीचा सामना हा गुरुवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे

199
ICC World Cup : सचिन तेंडुलकर विश्वचषकाचा ग्लोबल अ‍ॅम्बेसिडर
ICC World Cup : सचिन तेंडुलकर विश्वचषकाचा ग्लोबल अ‍ॅम्बेसिडर

वनडे वर्ल्डकपबाबत सर्वांचीच उत्कंठा शिगेला पोहचली आहे. वनडे विश्वचषकासाठी (ICC World Cup)अवघे दोनच दिवस उरले आहेत. त्यातच आयसीसीच्या वतीनं क्रिकेटचा देव म्हणुन ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याची वन डे विश्वचषकासाठी ग्लोबल अ‍ॅम्बेसिडर म्हणुन नियुक्ती करण्यात आली. इंग्लंड आणि न्यूझीलंड संघांमधल्या या सामन्याआधी आयसीसी विश्वचषकासोबत मैदानात उतरण्याचा आणि विश्वचषक स्पर्धेचं उद्घाटन झाल्याचं जाहीर करण्याचा मान आयसीसीकडून सचिन तेंडुलकरला देण्यात आला आहे.

काही दिवसांपुर्वी आयसीसी वर्ल्ड कप ट्रॉफीची भारताती काही शहरांमध्ये मिरवणुक देखील काढण्यात आली होती. भारतात आयोजित कऱण्यात आलेला हा विश्वचषक महत्वाचा असणार आहे. आगामी विश्वचषकाचा सलामीचा सामना हा गुरुवारी (५ सप्टेंबर)अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.वनडे क्रिकेटमध्ये सचिनने अमूल्य योगदान दिले आहे, त्यामुळे त्याची निवड करण्यात आली आहे. (ICC World Cup )

(हेही वाचा : Sir Tan Se Juda : ‘सर तन से जुडा’चा नारा देणाऱ्या अजमेर दर्ग्याच्या चिश्तीला जामीन नाहीच, सुप्रीम कोर्टाने दिला हा निर्णय)

वर्ल्ड कपचे माझ्या मनात नेहमीच एक वेगळे स्थान
याबाबत सचिन तेंडुलकर म्हणाला की ,” भारतात जेव्हा प्रथम वर्ल्ड कप झाला त्यावेळी १९८७ साली मी बॉल बॉय होतो. पण त्यानंतर मी सहा वर्ल्ड कपमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करू शकलो. वर्ल्ड कपचे माझ्या मनात नेहमीच एक वेगळे स्थान आहे. २०११ साली भारताने वर्ल्ड कप जिंकला आणि हा माझ्या क्रिकेट प्रवासातील सर्वात अभिमानास्पद क्षण आहे. यावर्षी होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी सर्वच संघ सज्ज झाले आहेत. मी देखील या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत आहे. युवा मुलां मुलींसाठी हा वर्ल्ड कप प्रेरणादायक ठरेल आणि त्यांना या स्पर्धेतून बरेच काही शिकता येईल. त्यामुळे ही स्पर्धा युवा पिढीसाठी महत्वाची आहे. सर्वच संघातील खेळाडू सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करतील, अशी मला आशा आहे.”

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.