Nagpur Patients Death : आता नागपूर मध्ये एकाच दिवसात २५ जणांचा मृत्यू ,राज्याची आरोग्यव्यवस्थाच व्हेंटिलेटरवर

ठाणे, नांदेड, छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्रातल्या शासकीय रुग्णालयांमध्ये मृत्यूतांडव सुरु आहे.

199
Nagpur Government Hospital : आता नागपूर मध्ये एकाच दिवसात २५ जणांचा मृत्यू ,राज्याची आरोग्यव्यवस्थाच व्हेंटिलेटरवर
Nagpur Government Hospital : आता नागपूर मध्ये एकाच दिवसात २५ जणांचा मृत्यू ,राज्याची आरोग्यव्यवस्थाच व्हेंटिलेटरवर

नांदेड,औरंगाबाद येथे शासकीय रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर झालेल्या रुग्णांच्या मृत्यू झाल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. नागपुरातील वैद्यकीय महाविद्यालय आणि इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालयातील आकडे तपासता गेल्या २४ तासांत २५ रुग्णाचा मृत्यू झाल्याचं आढळून आलंय.  यात १६ रुग्ण हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातले तर ९रुग्ण हे इंदिरागांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यातले आहेत. (Nagpur Patients Death) २५ पैकी १२ रुग्ण हे शेवटच्या क्षणाला खासगी रुग्णालयातून शासकीय रुग्णालयात या रुग्णांना हलवण्यात आलं आहे. शासकीय शासकीय रुग्णालयात सर्वांनाच अॅडमिट करून घ्यावं लागतं त्यामुळे मृत्यूचे हे मोठे आकडे दिसत असल्याचे रुग्णालय प्रशासनाचं म्हणणं आहे. मात्र यामध्ये शासकीय रुग्णालयाची आपण याला जबाबदारच नाही आहोत अशीच काहीशी भूमिका असल्याचे पाहावयास मिळत आहे. तर राज्यातील शासकीय रुग्णालयांची अशी स्थिती पाहता जणु काही राज्याची आरोग्यवस्थाच व्हेंटिलेटरवर असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटताना दिसत आहे. (Nagpur Patients Death)

ठाणे, नांदेड, छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्रातल्या शासकीय रुग्णालयांमध्ये मृत्यूतांडव सुरु आहे. ठाण्याच्या कळवा रुग्णालयात झालेल्या मृत्यूतांडवाला जबाबदार कोण याचा अहवाल अजूनही आलेला नाही. तोपर्यंतच नांदेड आणि औरंगाबादमध्ये आणखी काही रुग्णांना जीव गमवावा लागलाय. सरकारी रुग्णालयांची दुरवस्था आणि प्रशासनाची अनास्था पुन्हा एकदा उघडी पडली आहे.

(हेही वाचा : OBC Reservation Hearing : स्थानिक स्वराज्य संस्था, ओबीसी आरक्षणाबाबतची सुनावणी 28 नोव्हेंबरला; राज्यातील निवडणुकांचे भवितव्य काय ?)

असे पुढे केले कारण
या संदर्भात अधिक माहिती देताना नागपूर शासकीय रुग्णालयाने स्वतःची बाजू सावरताना असे सांगितले आहे की खासगी रुग्णालय आपल्या मृत्यूचा आकडा कमी करण्यासाठी शेवटच्या क्षणाला अत्यवयस्थ अवस्थेतील व्हेंटिलेटरवरचे रुग्ण शासकीय रुग्णालयात पाठवतात. २५ पैकी १२ रुग्ण हे शेवटच्या क्षणाला खाजगी रुग्णालयातून शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले होते. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ८ ते इंदिरा गांधी शासकीय महाविद्यात चार रुग्ण आले. खाजगी रुग्णालय रुग्णाची स्थित बघून अॅडमिट करून घेतात तर शासकीय रुग्णालयात सर्वांनाच अॅडमिट करून घ्यावे लागते त्यामुळे मृत्यूचे हे मोठे आकडे दिसत असल्याचे रुग्णालयात प्रशासनाचे म्हणणे आहे. (Nagpur Patients Death)

नांदेडच्या रुग्णालयाचा अजबच कारभार
नांदेडच्या शासकीय रुग्णालयात एका दिवसात झालेल्या मृत्यूचा हा आजवरचा सर्वात मोठा आकडा आहे. एका बेडवर दोन ते तीन बालकांवर उपचार सुरू होते अशी धक्कादायक माहित आहे. एकमेकांना इन्फेक्शन होवून ही बालके दगावली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सलग सुट्ट्यांमुळे नांदेड शहरातली खाजगी रूग्णालये बंद होती. त्यामुळं सरकारी रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढली. तर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातही २४ तासात १८ जणांचा मृत्यू झाला हे मृत्यू औषधांचा तुटवडा किंवा प्रशासनाच्या कमतेरतेमुळं झाले नाहीत असा दावा रुग्णालयाचे डीन संजय राठोड यांनी केला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.