राज्यात १ ऑक्टोबरपासून टोल वाढल्यामुळे स्कूल बस असोसिएशनने दरवाढीचा निर्णय घेतला आहे. (School Bus Fares) शाळेची फी, वह्या-पुस्तकांच्या वाढलेल्या किमती यांमुळे आधीच पालकांचे कंबरडे मोडले असताना आता स्कूल बसच्या भाड्यात तब्बल ५ टक्के वाढ करण्यात आली आहे. टोल वाढीमुळे हा निर्णय घेतल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी सांगितले. (School Bus Fares)
खराब रस्त्यांमुळेही वाहनांचे नुकसान होत आहे. त्यांचा त्रास केवळ विद्यार्थ्यांना होत नाही, तर बसचेही नुकसान होते. त्यामुळे देखभालीच्या खर्चात वाढ होते. त्यात आता टोल वाढला आहे. बसेसच्या टोलमध्ये १३० ते १५० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. एक बस एका टोलवरून ३-४ वेळा जाते. त्यामुळे दरवाढीशिवाय पर्याय उरला नाही, असेही गर्ग म्हणाले. (School Bus Fares)
वाशी, दहिसर, ऐरोली, ठाणे आणि मुलुंड येथील टोलनाका ओलांडणाऱ्या स्कूल बसमधून प्रवास करणाऱ्या ५ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांच्या पालकांना आता हा बस भाडेवाढीचा फटका सहन करावा लागणार आहे. राज्यात सर्व ठिकाणी टोल माफ आहे, तसा मुंबईतही टोल माफ करावा, अशी आमची मागणी आहे. सरकारने आम्हाला टोल माफ केला, तर पालकांना आर्थिक ताण बसणार नाही. (School Bus Fares)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community