मद्यविक्रीच्या दुकानावर होणारी गर्दी लक्षात घेता, मुंबईतील मद्यविक्रीची दुकाने बंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे ग्राहकांना घरपोच मद्य पुरवण्याची परवानगी मद्यविक्रेत्यांना देण्यात आली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे राज्य शासनाने मुंबईसह राज्यात कडक निर्बंध आखून दिले आहेत. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यभरात जमावबंदी लागू केलेली असताना मद्यविक्रीच्या दुकानात मात्र दारू घेण्यासाठी तळीरामांची झुंबड उडत आहे.
तळीराम झाले हैराण
पूर्णतः लॉकडाऊन लागून गेल्या वर्षी ओढवलेली परिस्थिती पुन्हा ओढवेल आणि आपल्याला सोमरस प्रशनापासून वंचित रहावे लागेल, या भीतीने मद्यप्रेमींची तारांबळ उडालेली आहे. त्यामुळे आपला ‘स्टॉक’ भरुन ठेवण्यासाठी तळीराम दारुच्या दुकानांत गर्दी करत आहे.
(हेही वाचाः ब्रेक दि चेन संदर्भात राज्य शासनाच्या नव्या स्पष्ट सूचना! कसे आहेत नियम?)
कोरोना वाढू नये म्हणून निर्णय
मद्यप्रेमींकडून मद्याचा स्टॉक करण्यात येत असून, मद्य खरेदी करण्यासाठी मद्यप्रेमींची दुकानांमध्ये झुंबड उडत आहे. त्यामुळे सोशल डिस्टनिंगच्या नियमांचा फज्जा उडत आहे. अशीच परिस्थिती राहिली तर कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची भीती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती ओढवू नये म्हणून, राज्य उत्पादन शुल्क आणि पोलिसांनी दुकानात मद्यविक्री बंद केली आहे. पण या पार्श्वभूमीवर आता घरपोच मद्य पुरवण्याची मुभा देण्यात आली आहे. अशी माहिती राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त कांतीलाल उमप यांनी दिली.
Join Our WhatsApp Community