Land for Job Scam : न्यायालयाचा मोठा निर्णय; लालू यादव, राबडीदेवी आणि तेजस्वी यादव यांना जामीन

राऊस एव्हेन्यू कोर्टाने लालू यादव, त्यांची पत्नी राबडीदेवी आणि मुलगा तेजस्वी यादव यांना ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.

128
Land for Job Scam : न्यायालयाचा मोठा निर्णय; लालू यादव, राबडीदेवी आणि तेजस्वी यादव यांना दिलासा
Land for Job Scam : न्यायालयाचा मोठा निर्णय; लालू यादव, राबडीदेवी आणि तेजस्वी यादव यांना दिलासा

नोकरीसाठी जमीन घोटाळा प्रकरणात लालू यादव कुटुंबियांना राऊस एव्हेन्यू कोर्टाने दिलासा दिला आहे. (Land for Job Scam) लालू यादव यांच्यासह न्यायालयाने राबडीदेवी, खासदार मीसा भारती आणि तेजस्वी यादव यांना जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने सर्वांना 50 हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. लँड फॉर जॉब प्रकरणात लालू यादव आणि राबडी देवी यांच्याशिवाय अन्य 6 आरोपींनी न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. तो न्यायालयाने मान्य केला असून सर्व 6 आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला आहे. गेल्या सुनावणीत न्यायालयाने राजद प्रमुख लालूप्रसाद यादव, त्यांच्या पत्नी आणि माजी मुख्यमंत्री राबडीदेवी, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि इतर सर्व १७ आरोपींना 22 सप्टेंबर रोजी समन्स बजावले होते. न्यायालयाने सर्व आरोपींना ४ ऑक्टोबर रोजी हजर राहण्याचे निर्देश दिले होते. सध्या हे सर्वजण जामिनावर आहेत. (Land for Job Scam)

(हेही वाचा – Nanded : खासदार हेमंत पाटील यांच्यावर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा; नांदेड रुग्णालय शौचालय स्वच्छता प्रकरण भोवले)

काय आहे प्रकरण ?

राऊस अव्हेन्यू न्यायालयाच्या विशेष न्यायाधीश गीतांजली गोयल यांनी हा निर्णय दिला. भ्रष्टाचार, गुन्हेगारी कट, आर्थिक फसवणूक या विरोधात प्रथमदर्शी अहवाल दाखल करण्यात आला. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) कथित घोटाळ्याप्रकरणी ३ जुलै रोजी आरोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणातील तपास यंत्रणेने दाखल केलेले हे दुसरे आरोपपत्र आहे. यात तेजस्वी यादव यांचे नाव आरोपी म्हणून ठेवण्यात आले आहे. (Land for Job Scam)

हे प्रकरण 2004 ते 2009 या कालावधीत लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री असतानाच्या काळातील आहे. ते मध्यप्रदेशातील जबलपूर येथील रेल्वेच्या पश्चिम-मध्य विभागाशी संबंधित आहे. एफआयआरमध्ये असा आरोप करण्यात आला आहे की, मुंबई, जबलपूर, कोलकाता, जयपूर आणि हाजीपूर येथे असलेल्या रेल्वेच्या विविध झोनमध्ये काही व्यक्तींना ग्रुप-डी पदांवर नियुक्त करण्यात आले होते. त्या बदल्यात त्यांनी किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी लालू यादव यांच्या नावावर जमीन आणि एके इन्फोसिस्टम प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी केली होती. त्यानंतर या कंपनीची मालकी लालू प्रसाद यांच्या कुटुंबियांनी घेतली होती.लालू प्रसाद यांच्या कुटुंबियांनी पाटण्यातील 1,05,292 चौरस फूट जमीन ५ विक्री सौदे करून दोन भेटवस्तूंच्या माध्यमातून लोकांकडून घेतल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यासाठी विक्रेत्यांना रोख रक्कम देण्यास सांगण्यात आले. या जमिनीची किंमत सध्या 4.32 कोटी रुपये आहे. ही जमीन लालू प्रसाद यांच्या कुटुंबाला यापेक्षा खूपच कमी किमतीत विकली गेली आहे. (Land for Job Scam)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.