MLA Disqualification : सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडल्याने ठाकरे गटाचं टेन्शन वाढलं

104
MLA Disqualification : सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडल्याने ठाकरे गटाचं टेन्शन वाढलं
MLA Disqualification : सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडल्याने ठाकरे गटाचं टेन्शन वाढलं

शिवसेना आमदार अपात्रता (MLA Disqualification) प्रकरणचा निकाल कधी आणि केव्हा लागतो याकडेच सर्वांचेच लक्ष लागले आहे. असे असताना शिवसेनेतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार पात्र की अपात्र, याबाबत सुप्रीम कोर्टात येत्या ६ ऑक्टोबर रोजी सुनावणी पार पडणार होती. मात्र आता पुन्हा एकदा सुनावणी लांबणीवर गेल्याने ठाकरे गटाचं टेन्शन वाढलं आहे. (MLA Disqualification)

महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणाची सुनावणी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात ते नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे. यासाठी ६ ऑक्टोबरच्या सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आमदार अपात्र प्रकरणाच्या सुनावणीचा रोडमॅप सादर करणार होते. मात्र, आता कोर्टाने ही सुनावणी पुढे ढकलली असल्याची माहिती आहे. प्रकरण लिस्टेड न झाल्याने ही सुनावणी ९ ऑक्टोबर रोजी होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. दरम्यान अपात्र आमदारांच्या सुनावणीबाबतीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप करत ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. (MLA Disqualification)

(हेही वाचा : Nanded : डॉक्टरांचा वाढदिवस; ७ वाजता दाखल झालेल्या महिलेचे सीझर रात्री ३ वाजता)

ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी ही याचिका दाखल केली होती.या याचिकेवर सुनावणी घेताना कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना फटकारलं होतं. त्यानुसार अध्यक्षांनी आमदारांची एक सुनावणी घेत पुढील वेळापत्रकही तयार केलेलं होतं. मात्र आता अध्यक्षांकडून मिळालेल्या वेळापत्रकानुसार दोन्ही गटांचे आमदार आणि बाजू मांडणारे वकील हे आता पुढील रणनीती ठरवणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.