मुंबई लोकल ट्रेनचे चाक रुळावरुन घसरल्याने त्याचा पश्चिम रेल्वे (western Railway) मार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. मुंबई सेंट्रल स्थानकाजवळ लोकलचे चाक रुळावरुन घसरल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. परिणामी सध्या स्लो ट्रॅक वरून बोरिवली मार्गावर जाणाऱ्या रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे बऱ्याच वेळ पश्चिम मार्गावर वाहतूक रखडली होती. लोकांचा चांगलाच खोळंबा झाला होता. (Western Railway)
पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल कारशेडमध्ये रिकामी लोकल जात असताना तिचे एक चाक रेल्वे रुळावरून घसरले. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते विरार लोकल सेवा २० ते २५ मिनिटे उशिराने धावत आहे. तसेच सर्व डाऊन धीम्या लोकल डाऊन जलद मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रशासनाने तातडीने घटनेची नोंद घेतली असून, देखभाल, दुरुस्तीचे कामही हाती घेण्यात आले आहे. पुढच्या काहीच वेळात वाहतुक पूर्ववत होईल, असे सांगितले जात आहे. दरम्यान, प्रवाशांचा मात्र चांगलाच खोळंबा झाला आहे. (Western Railway)
(हेही वाचा : MLA Disqualification : सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडल्याने ठाकरे गटाचं टेन्शन वाढलं)
Join Our WhatsApp Community