राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात नव्याने इलेक्ट्रिक बस (EV Buses Ticket) दाखल होणार आहेत. या नव्या बसच्या तिकिटाची किंमत कमी असावी, याबाबत एस.टी. महामंडळाकडून (st-corporation) हालचाली सुरू आहेत.
ई बस तिकिटांच्या किमतींबाबत राज्य सरकारकडून समिती (Committee from state Govt) स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये तिकिटांच्या दरांबाबत चर्चा करण्यात येणार आहे. दररोज पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती लक्षात घेता शासनाने ई-बससेवा सुरू केली आहे. आता नव्या ई बसची सेवा उपलब्ध होणार आहे.
(हेही वाचा – Land for Job Scam : न्यायालयाचा मोठा निर्णय; लालू यादव, राबडीदेवी आणि तेजस्वी यादव यांना जामीन)
मुंबई आणि नवी मुंबईमध्ये काही प्रमाणात ई-बससेवा सुरू झाली आहे. सध्या विविध गोष्टींवर आकारण्यात येणाऱ्या टॅक्समुळे राज्यात महागाईचा भडका उडाला आहे. भाजीपाल्यासह अन्नधान्याच्या किमतीत वाढत्यामुळे प्रशासनाने ई-बस तिकिटांच्या किमती कमी केल्या तर बस प्रवाशांना दिलासा मिळेल, अशी आशा व्यक्त होत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community