Open Deck Bus: नीलांबरीचे शेवटचे मुंबई दर्शन

२५ वर्षे सेवा देणारी बस सेवेतुन हद्दपार होणार आहे

182
Open Deck Bus: नीलांबरीचे शेवटचे मुंबई दर्शन
Open Deck Bus: नीलांबरीचे शेवटचे मुंबई दर्शन

मुंबई दर्शन घडवणारी आणि पर्यटकांच्या आणि विशेष लहान मुलांच्या नेहमीच आकर्षणाची ठरणारी विनावातानुकूलित शेवटची ओपन बस गुरुवारी (५ ऑक्टोबरला) तिची शेवटची फेरी असणार आहे. लवकरच १० नव्या वातानुकूलित ओपन डेक (Nilambari) बसची खरेदी केली जाणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आल्याची माहिती बेस्ट (Mumbai Best ) उपक्रमाने दिली.

मागील २५ वर्षे सेवा देणारी बस सेवेतुन हद्दपार होणार आहे. बेस्ट उपक्रमाने एमटीडीसीच्या मदतीने २६ जानेवारी १९९७ला विनावातानुकूलित ओपन डेक बस सुरू केली. यामध्ये अप्पर डेक आणि लोअर डेक असे प्रकार आहेत. या बसमधून पूर्वी पश्चिम उपनगरातील पर्यटनस्थळांना भेट देण्यात येत होती. त्यानंतर ३ नोव्हेंबर २०२१ पासून दक्षिण मुंबईमध्ये या बसच्या पर्यटनसेवेचा शुभारंभ करण्यात आला. सकाळी आणि दुपारी सुरू असलेल्या या सेवेच्या वेळेत वाढलेल्या उकाड्यामुळे बदल करण्यात आला. त्यानंतर बसच्या फेऱ्या सायंकाळी ६.३० ते रात्री ८.३०पर्यंत होऊ लागल्या. (Mumbai Best)

प्रत्येक महिन्याला साधारण २० हजार पर्यटक याचा आनंद घेत होते. सध्या बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात तीन ओपन डेक बस होत्या. १६ सप्टेंबरला पहिली, २५ सप्टेंबरला दुसरी आणि ५ ऑक्टोबरला शेवटची बस सेवेतून बाद होणार आहे. एका बसचे आयुर्मान हे साधारण १५ वर्षे असते. त्यामुळे मोटर वाहन नियमानुसार ही बस मोडीत काढली जाणार आहे.

(हेही वाचा : Indian Navy तर्फे कॅडेट प्रशिक्षण Naval Dockyard येथे पार पडले)

शेवटची बस सेवेतून हद्दपार होणार असल्याने आणि ओपन डेक बसला पर्यटकांचा मिळणारा प्रतिसाद पाहता बेस्ट उपक्रमाने नवीन डबल डेकर ओपन डेक बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीची निविदाप्रक्रियाही सुरू आहे. अशा १० बस खरेदी केल्या जाणार असून अप्पर डेक ओपन असेल आणि लोअर डेक वातानुकूलित असेल. या बससाठी येण्यास काही कालावधी लागणार असल्याने आणि ५ ऑक्टोबरला शेवटची विनावातानुकूलित बस बाद होणार असल्याने तोपर्यंत ताफ्यातील डबल डेकर एसी बस पर्यटकांसाठी चालवण्यात येत आहेत.

हेही पहा –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.