Mumbai Dengue Malaria : मलेरिया, डेंगी आजारांच्या प्रतिबंधासाठी महानगरपालिका ॲक्शन मोडवर

115
Mumbai Dengue Malaria : मलेरिया, डेंगी आजारांच्या प्रतिबंधासाठी महानगरपालिका ॲक्शन मोडवर
Mumbai Dengue Malaria : मलेरिया, डेंगी आजारांच्या प्रतिबंधासाठी महानगरपालिका ॲक्शन मोडवर

पावसाळ्यात साचलेल्या पाण्यामुळे उद्भवणाऱ्या मलेरिया आणि डेंगी आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने महानगरपालिका कार्यक्षेत्रात विशेष शोध मोहीम राबविली आहे. या शोध मोहिमेअंतर्गत महानगरपालिकेच्या कीटक नाशक विभागाने जानेवारी २०२३ ते ३० सप्टेंबर २०२३ या ९ महिन्यांच्या कालावधीत तब्बल १ लाख ६ हजार ८९८ डेंगी आणि मलेरिया डासांची उत्पत्ती स्थळे नष्ट केली आहेत. नागरिकांनीही त्यांच्या स्तरावर घरात आणि सोसायटी परिसरात नियमित पाहणी करावी, डासांची उत्पत्ती स्थाने नष्ट करावीत, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. मुंबईत नियमितपणे सर्व स्तरीय कार्यवाही करतानाच जनजागृती मोहीमदेखील नियमितपणे राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून ‘एनोफिलीस’ आणि ‘एडिस’ या डासांची उत्पत्ती स्थळे नष्ट केली जातात. यासाठी घरोघरी सर्वेक्षण करून महानगरपालिकेच्या कीटक नाशक विभागाकडून कार्यवाही केली जाते. (Mumbai Dengue Malaria)

महानगरपालिकेच्या कीटक नाशक विभागाने जानेवारी २०२३ ते ऑक्टोबर २०२३ या ९ महिन्यांच्या कालावधीत तब्बल ९४ हजार ९९७ डेंगीच्या डासांची उत्पत्ती स्थळे नष्ट केली आहेत. यासाठी १ कोटी २७ लाख ५ हजार ३८६ घरांना भेटी देऊन तेथील १ कोटी ९९ लाख ७ हजार ८२२ केंटनरची तपासणी केली आहे. तपासणी मोहिमेदम्यान अनेक घरांना २ किंवा त्यापेक्षा जास्त वेळा भेटी दिल्या जातात. अशा १ कोटी २७ लाख ५ हजार ३८६ घरांना भेटी देण्यात आल्या आहेत. तसेच मागील वर्षी म्हणजे २०२२ मध्ये ८३ लाख ९४ हजार ५३० घरांना भेटी देऊन ८९ लाख ६६ हजार २४० कंटेनरची तपासणी केली होती. यामध्ये ५३ हजार ४९६ डासांची उत्पत्ती स्थळे नष्ट करण्यात आली होती. त्याबरोबरच २०२१ मध्ये ८१ लाख ६६ हजार १३ घरांना भेटी देऊन ८६ लाख ९४ हजार ७९६ कंटेनरची तपासणी करण्यात आली होती. या तपासणीदरम्यान आढळून आलेली ४६ हजार २५९ डासांची उत्पत्ती स्थळे नष्ट केली होती. (Mumbai Dengue Malaria)

कीटक नाशक विभागाने डेंगीसोबतच मलेरिया या आजाराला कारणीभूत असलेल्या ऍनोफिलीस या डासांची उत्पत्ती स्थळे देखील नष्ट केली आहेत. या मोहिमेअंतर्गत जानेवारी २०२३ ते ऑक्टोबर २०२३ या ९ महिन्यांच्या कालावधीत तब्बल ११ हजार ७०१ मलेरियाच्या डासांची उत्पत्ती स्थळे नष्ट केली आहेत. यासाठी २० लाख ३ हजार २७४ घरांना भेटी देऊन ५ लाख ९६ हजार ३९१ कंटेनरची तपासणी करण्यात आली. तसेच २०२२ मध्ये ३० हजार ९२ घरांना भेटी देऊन ३ लाख ९२ हजार ६० कंटेनरची तपासणी करण्यात आली होती. यामध्ये ८ हजार १९५ डासांची उत्पत्ती स्थळे नष्ट केली होती. तर २०२१ मध्ये ३७ हजार ६१४ घरांना भेटी देऊन २ लाख ४७७ कंटेनरची तपासणी केली होती. यामध्ये ८ हजार ८५६ डासांची उत्पत्ती स्थळे नष्ट करण्यात आली होती. डेंग्यू आणि मलेरियासारख्या आजारांना प्रतिबंध घालण्यासाठी महानगरपालिका सर्वोतोपरी प्रयत्न करतच आहे. याबरोबरच नागरिकांनीदेखील महानगरपालिकेच्या सुचनांनुसार आपल्या घरातील आणि घराचा परिसर स्वच्छ ठेऊन या आजाराचा प्रसार होणार नाही याची खबरदारी घेणे अपेक्षित आहे. डेंगी आणि मलेरियाच्या वाढत्या रूग्णांच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी देखील सर्व सहायक आयुक्त यांना आपापल्या विभागात डासांची उत्पत्ती स्थळे नष्ट करण्यासाठी संयुक्त पथके तयार करून प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. (Mumbai Dengue Malaria)

(हेही वाचा – International Space Station : खगोलप्रेमी, अभ्यासकांना आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक पाहण्याची पर्वणी; जाणून घ्या वेळ आणि दिशा)

झोपडपट्टी आणि इतर क्षेत्रात डासांची उत्पत्ती होण्यास कारणीभूत ठरणारे जुने टायर, पाण्याच्या टाक्या, नळ्या, प्लास्टिक कंटेनर यांसारख्या वस्तू हटवण्यासाठी संयुक्त कृती कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्यात यावा. यासाठी कीटक नाशक विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग, सहाय्यक अभियंता (परिरक्षक) आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचनादेखील अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी यांनी दिल्या आहेत. नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये ‘मुंबई अगेन्स्ट डेंग्यू’ हे अॅप डाउनलोड करून घ्यावे. जेणेकरून या अॅपच्या माध्यमातून डासांची उत्पत्तीची ठिकाणे आणि घ्यावयाची काळजी याबाबतची अधिक माहिती मिळेल. यामुळे डासांच्या उत्पत्तीवर नियंत्रण ठेवण्यास आणि डेंगीचा प्रसार रोखण्यास मदत होईल, असेदेखील अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी यांनी नमूद केले आहे. (Mumbai Dengue Malaria)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.