Asian Games 2023 : अविनाश साबळेने मिळवले दुसरे पदक; रचला नवा इतिहास

१९८२नंतर या क्रीडा प्रकारातील भारताचे हे पहिले पदक ठरले.

214

Asian Games 2023 मध्ये भारत पदकांची लयलूट करत आहे. यातही महाराष्ट्राच्या खेळाडूंनी इतिहास रचला आहे. महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातल्या अविनाश साबळे (Avinash Sable) याने आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये इतिहास रचला. ३००० मीटर स्टीपलचेस स्पर्धेतील सुवर्णपदकानंतर अविनाशने बुधवार, ४ ऑक्टोबर रोजी ५००० मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकले.

अविनाशने शेवटच्या लॅपपर्यंत तिसरे स्थान टिकवले होते, परंतु शेवटच्या लॅप्सची बेल वाजली अन् त्याने दुसऱ्या क्रमांकावर कूच केली. पण बाहरिनच्या फिकादू दावीतने मिळवलेली आघाडी तो कमी करू शकला नाही. त्याला रोप्यपदकावर समाधान मानावे लागले.

१९८२नंतर या क्रीडा प्रकारातील भारताचे हे पहिले पदक ठरले. भारतीय लष्करात असलेल्या अविनाशने ३००० मीटर स्टीपलचेस (अडथळ्यांची) शर्यतीत ८ मिनिटे १९.५० सेकंदाची वेळ नोंदवत भारतासाठी ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले होते. तो आशियातील सर्वात वेगवान ३००० मीटर स्टीपलचेसपटू ठरला. अविनाशने २०१८ च्या जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत Asian Games 2023 इराणच्या होसेन केहानीचा ८ मिनिटे २२.७९ सेकंदाचा चा आशियाई विक्रम मोडला. ३००० मीटर स्टीपल चेस स्पर्धेत अविनाशने सुरुवातीपासूनच गती सेट केली आणि पहिल्या ५० मीटरमध्ये उर्वरित खेळाडूंना मागे टाकले. त्याने शेवटपर्यंत हा वेग कायम ठेवला. अविनाश १२वी उत्तीर्ण झाल्यानंतर इंडियाना आर्मीमध्ये दाखल झाला.

(हेही वाचा Open Deck Bus: नीलांबरीचे शेवटचे मुंबई दर्शन)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.