घामाची दुर्गंधी दूर करण्यासाठी अनेकांना परफ्युम, डिओडोरंट, अत्तर अशी सुगंधी द्रव्ये वापरण्याची सवय असते. काही वेळा यामुळे दुष्परिणामही होऊ शकतात. यामध्ये अल्कोहोलचा वापर केला जात असल्यामुळे वैमानिक आणि केबिन कर्मचाऱ्यांनी (cabin crew) ही सुगंधी द्रव्ये वापरू नयेत. ( Perfume Ban) याविषयी विमान कंपन्या, वैमानिक (pilots) आणि विमान उद्योगाशी संबंधित घटकांकडून हरकती आणि सूचना मागविण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
या सूचना आणि हरकती प्राप्त झाल्यानंतर त्या अनुषंगाने विमान प्रवासादरम्यान वैमानिक आणि केबिन कर्मचाऱ्यांना परफ्युम, माऊथवॉश, विशिष्ट प्रकारची औषधे यांच्या वापरावर बंदी घालण्यासंदर्भात निर्देश जारी करण्याचे संकेत मिळणार आहेत. परफ्युम, माऊथवॉश तसेच काही औषधांमध्ये अल्कोहोलची मात्रा असते. त्यामुळे मद्य प्राशन केले नसले , तरी या घटकांच्या वापरामुळे वैमानिकांच्या ब्रेथ अॅनालायझर चाचणीवेळी अल्कोहोलचे प्रमाण सकारात्मक येऊ शकते. यामुळे उड्डाणास प्रतिबंध केला जाऊ शकतो.
(हेही वाचा – Share Market : सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, वाचा कोणते वधारले आणि बुडाले… )
वैमानिक आणि केबिन कर्मचाऱ्यांना सूचना…
ज्या कर्मचाऱ्यांना विशिष्ट प्रकारचे आजार आहेत किंवा औषधे घ्यावी लागतात त्यांनी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डॉक्टरांना आपल्या कामाची कल्पना द्यावी. अशा सूचना विमान कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. येत्या दोन महिन्यांत या मुद्द्यावर डीसीजीएकडून (DGCA) निर्देश जारी करण्यात येणार आहेत.
हेही पहा –