सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणात (Ujani Dam) गेल्या २४ तासांत ४८. ८४ टक्के वाढ झाली आहे. यामुळे धरणात २६ टीएमसी पाणीसाठा जमा झाला असून परतीच्या पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होण्याची शक्यता जलसंपदा विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. ( Water Resources Department )
खडकवासला, वरसगाव आणि पानशेत (Khadakwasla, Varasgaon and Panshet) ही धरणे सप्टेंबर महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे पूर्ण क्षमतेने भरली तसेच टेमघर धरणात ७५ टक्क्यांपेक्षा जास्त पाणी जमा झाले. कुकडी प्रकल्पातूनही पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्याचा फायदा म्हणजे उजनीतील पाणी साठा वाढण्यास मदत झाली. यामुळे हा पाणीसाठा वाढून ४८.८४ टक्क्यांवर पोहोचला आहे.
(हेही वाचा – Sanjay Singh : आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांना अटक )
उजनी धरणात २६ टीएमसी पाणी असून, ते येत्या काही दिवसांत भरले नाही, तर शेतीला पाणी कमी पडण्याची शक्यता ‘जलसंपदा विभागा’ने व्यक्त केली आहे तसेच सोलापूर शहरासह उस्मानाबाद, बार्शी, करमाळा, बारामती, इंदापूर, कर्जत येथील पाणीपुरवठ्याच्या योजनाही उजनी धरणातील पाण्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे शेतीला पाणी न सोडता काही दिवसांपूर्वी सोलापूर शहराला नदीतून पाणी सोडण्यात आले होते. तरीही परतीचा पाऊस चांगला झाल्यास उजनी धरण पूर्ण भरेल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community