नुकतेच G-20 शिखर परिषदेचे यशस्वी आयोजन करून जगभरात भारताचा गौरव करणारे आणि सर्व देशांना सोबत घेऊन जाणारे भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सर्व जागतिक स्तरावरील नेते कौतुक करत असतात. (Russia-India Relations) ब्रिटन, अमेरिका, इटली वा ब्राझील अशा अनेक देशांच्या नेत्यांनी प्रमुखांनी पंतप्रधान मोदी यांचे गुणगान केले. आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. यावेळी पुतिन यांनी मोदींचे कौतुक करत त्यांना ‘अतिशय बुद्धिमान व्यक्ती’, असे म्हटले आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारत वेगाने प्रगती करत असल्याचे पुतीन यांनीही मान्य केले. (Russia-India Relations)
(हेही वाचा – Mumbai High Court : उल्हासनगरमध्ये कायद्याचे राज्य नाही का; का संतापले उच्च न्यायालय)
भारताच्या सहकार्याची इच्छा
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आर्थिक सुरक्षेवर आयोजित एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदींना भारताबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी ‘बुद्धीमान’ हा शब्द वापरला. पुतिन यांनी म्हटले की, आर्थिक सुरक्षा कार्यक्रमावर काम करणे भारत आणि रशिया या दोन्ही देशांच्या हिताशी जुळते. आर्थिक सुरक्षा आणि सायबर गुन्ह्यांविरोधातील लढाईत भारताच्या सहकार्याची इच्छा रशियाच्या अध्यक्षांनी व्यक्त केली. भारत आणि रशियाची मैत्री अनेक दशके जुनी असली तरी, मागच्या काही काळात रशिया-भारत संबंध अधिक दृढ झाले. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर दोन्ही देशांमधील व्यापार आणि सहकार्यामुळे हे नाते अधिक घट्ट झाले आहे. (Russia-India Relations)
युक्रेन युद्धाबाबत भारताने G-20 शिखर परिषदेदरम्यान ज्या प्रकारे भूमिका घेतली, त्यामुळे रशियाचे अध्यक्ष पुतिन पंतप्रधान मोदींचे चाहते झाले. बाली येथे झालेल्या G-20 बैठकीत युक्रेन युद्धावर बराच काळ वाद झाला होता. अनेक देशांनी रशियाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला; पण दिल्ली येथे झालेल्या G-20 शिखर परिषदेत भारताने रशियाचा बचाव केला. भारताने युक्रेनचे युद्ध चुकीचे म्हटले पण त्यासाठी रशियाला दोष दिला नाही. यासाठी रशिया भारतावर खूश आहे.
पुतीन यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक करण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या महिन्यात 8 व्या ईस्टर्न इकॉनॉमिक फोरमला संबोधित करताना पुतिन यांनी मेक इन इंडिया मोहिमेसाठी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले होते. ‘रशियाला भारताकडून शिकण्याची गरज आहे’, असेही पुतीन त्या वेळी म्हणाले होते. (Russia-India Relations)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community