President Of Maldives : मालदीवच्या राष्ट्रपतीपदी चीनसमर्थक मोहम्मद मुइज्जू; पहिलेच वक्तव्य भारताविरोधात 

163
President Of Maldives : मालदीवच्या राष्ट्रपतीपदी चीनसमर्थक मोहम्मद मुइज्जू; पहिलेच वक्तव्य भारताविरोधात 
President Of Maldives : मालदीवच्या राष्ट्रपतीपदी चीनसमर्थक मोहम्मद मुइज्जू; पहिलेच वक्तव्य भारताविरोधात 

मालदीवमध्ये चीन समर्थक नेते मोहम्मद मुइज्जू यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकली आहे. (President Of Maldives) मालदीवमध्ये नुकत्याच झालेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विरोधी मोहम्मद मुइज्जू यांनी 53 टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळवून विजय मिळवला. मुइझ्झू यांनी या निवडणुकीत प्रोग्रेसिव्ह पार्टी ऑफ मालदीवचे (PPM) उमेदवार आणि भारत समर्थक विद्यमान राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिह यांचा पराभव केला. चीनसमर्थक मोहम्मद मुइज्जू मालदीवचे राष्ट्रपती बनल्याने भारताची डोकेदुखी वाढली आहे.मालदीवचे नवे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू चीन समर्थक असल्याचे त्यांनी विजयानंतर लगेचच सिद्ध केले. विजयानंतर लगेचच भारताविरोधात वक्तव्य केले आहे. मोहम्मद मुइज्जू यांनी त्यांच्या भाषणात मालदीवमधून भारतीय सेना हटवण्याबाबत पुन्हा एकदा वक्तव्य केले आहे. (President Of Maldives)

(हेही वाचा – Russia-India Relations : रशियाने केले पंतप्रधान मोदींचे कौतुक; काय म्हणाले राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन)

भारताने स्वातंत्र्यात हस्तक्षेप केल्याचा आरोप

निवडणूक जिंकल्यानंतरच्या भाषणात मुइज्जू म्हणाले की, देशवासियांच्या इच्छेविरुद्ध कोणतेही विदेशी सैन्य मालदीवमध्ये राहणार नाही. राष्ट्रपतीपदभाराच्या पहिल्याच दिवसापासून ते परदेशी सैन्य हटवण्याचे प्रयत्न सुरू करतील. यासाठी जनतेने आपल्याला मतदान केले आहे, त्यामुळे मी आपल्या वचनावर ठाम राहणार असल्याचे मुइज्जू यांनी म्हटले आहे. (President Of Maldives)

यापूर्वी मुइज्जू यांनी निवडणुकीच्या प्रचारातील भाषणादरम्यान, मुइज्जू यांनी सोलिह सरकारवर अनेक आरोप केले होते. भारताने मालदीवच्या सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्यात हस्तक्षेप केला आहे, असाही आरोप मुइज्जू यांनी केला होता. मालदीवचे माजी राष्ट्रपती सोलिह यांच्यावरही मुइज्जू यांनी आरोप केले आहेत. भारताला मालदीवमध्ये आपल्या इच्छेनुसार वागण्याचे स्वातंत्र्य दिल्याचा आरोप मुइज्जू यांनी केला होता. राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकल्यास मालदीवमधून भारतीय सैन्य हटवून देशाचे व्यापारी संबंध संतुलित ठेवू, असे आश्वासन मुइज्जू यांनी जनतेला दिले होते.

भारतासाठी डोकेदुखी

मोहम्मद मुइज्जू यांनी पहिल्याच भाषणात ‘इंडिया आऊट’चा नारा दिला आहे. मुइज्जू यांनी प्रचारादरम्यानही ‘इंडिया आऊट’चा नारा दिला होता. ते याआधी माले शहराचे आमदार होते. मुइज्जू यांची वक्तव्य नेहमी चीनच्या बाजूने असल्याचे पाहायला मिळते. चीनसोबतचे संबंध अधिक मजबूत करण्यावर त्यांचा भर आहे. (President Of Maldives)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.