Monsoon Update : राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ तर, देशात थंडीची चाहूल

125
Monsoon Update : राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ तर, देशात थंडीची चाहूल

राज्यात सध्या संमिश्र वातावरण (Monsoon Update) अनुभवायला मिळत आहे. त्यामुळे अनेकांना वेगवेगळ्या आजारांना सामोरं जावं लागत आहे. एकीकडे ऑक्टोबर हिटची उष्णता तर दुसरीकडे परतीच्या पावसाचा जोर, तर काही ठिकाणी थंडीची चाहूल असं साध्याचं वातावरण आहे. अशातच हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये कोकण (Konkan) आणि विदर्भात (Vidarbha) मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, पुढच्या 48 तासांमध्ये मुंबई, पुणे आणि ठाण्यामध्ये मधूनमधून पावसाच्या जोरदार (Monsoon Update) सरी बरसणार आहेत.

हवामान विभागाने पुढे सांगितले की; “मुंबईत तुलनेनं हवामान (Monsoon Update) दमट राहणार असून, सकाळ आणि दुपारच्या वेळी उन्हाचा चटका बसणार आहे तर कोकण किनारपट्टी भागात मात्र अंशत: ढगाळ वातावरण पाहायला मिळेल.

(हेही वाचा – Samruddhi Highway : समृद्धी महामार्ग पाच दिवसांसाठी बंद; नेमकं कारण काय?)

तर दुसरीकडे दिल्ली, राजस्थान, हिमाचल, हरियाणा, उत्तराखंडमधून मान्सूनच्या (Monsoon Update) परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. तर, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेशच्या विविध भागांमधूनही मान्सूननं काढता पाय घेण्यास सुरुवात केली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.