RC Book Digitisation : कागदी आरसी बुक जपून ठेवणे आता विसरा; होणार ‘हा’ बदल

366
RC Book Digitisation : कागदी आरसी बुक जपून ठेवणे आता विसरा; होणार 'हा' बदल
RC Book Digitisation : कागदी आरसी बुक जपून ठेवणे आता विसरा; होणार 'हा' बदल

वाहनाचे आरसी बुक वर्षानुवर्षे जपून ठेवणे, हे मोठे जिकिरीचे काम होते. (RC Book Digitisation) पूर्वीचे कागदी आरसी बुक आणि लायसन्स आता हद्दपार झाले आहे. वाहन परवाना तर स्मार्टकार्ड रूपात आलाच आहे. त्या सोबत आता वाहन नोंदणी प्रमाणपत्र (आरसी बुक) छपाईसाठी नवीन करार करण्यात आला आहे. नवे आरसी बुक आणि लायसन्स वर चिपऐवजी क्यूआर कोड असून डिजिटल स्वरूपात ते उपलब्ध होणार आहे. कार्डवर अवयवदानासह रक्तगटाचीही माहिती देण्यात आली आहे. ऑगस्टपासून सर्व वाहनचालकांना नवीन आरसी बुक येत आहेत, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत देशमुख यांनी दिली. (RC Book Digitisation)

(हेही वाचा – Latur Earthquakes : लातूर जिल्ह्यात तीन दिवसांत चार भूकंपाचे धक्के जाणवले; गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण)

नव्या रूपातील स्मार्ट कार्ड पुरवण्याचे कंत्राट कर्नाटक राज्यातील एमसीटी कार्ड अँड टेक्नॉलॉजी कंपनीला देण्यात आले असून वितरण सुरू आहे. नवीन स्मार्ट कार्ड निळ्या रंगाचे आहे. या नवीन कार्डच्या पुढील बाजूस नाव, पत्ता, जन्मतारीख, अवयवदानासह रक्तगटाची माहिती असेल. मागील बाजूस क्यूआर कोड व कार्डच्या मुदतीसह इतर माहिती आहे. (RC Book Digitisation)

एमएच – ०१ ते एमएच – १७ या जिल्ह्यांचे आरसी बुक मुंबई येथे, एमएच १८ ते एमएच – ३४ या जिल्ह्यांचे आरसी बुक छत्रपती संभाजीनगर येथे, एमएच ३५ ते एमएच – ५१ या जिल्ह्यांचे आरसी बूक नागपूर शहर येथे तयार करण्यात येत आहेत. (RC Book Digitisation)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.