नांदेडमध्ये (Nanded) सध्या शासकीय रुग्णालयांत मृत्यूचे जे सत्र सुरु झाले ते थांबण्याचे नाव घेत नाही. मागील ४ दिवसांत या रुग्णालयात ५१ रुग्णांचे मृत्यू झाले. त्यामुळे पुन्हा एकदा हे रुग्णालय चर्चेत आले आहे. मागील २४ तासांत या रुग्णालयात १४ रुग्णांचा मृत्यू झाला.
रुग्णालयाचे अधिष्ठाता यांच्यावर गुन्हा दाखल
नांदेडमध्ये (Nanded) विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सध्या वाईट गोष्टीसाठी चर्चेत आले आहे. या ठिकाणी २ ऑक्टोबर रोजी मृत्यूचे सत्र सुरु झाले. या ठिकाणी २४ तासांत २४ रुग्णांचा मृत्यू झाला, त्यानंतर ३ ऑक्टोबर रोजी ७ रुग्णांचा मृत्यू झाला, तर ४ ऑक्टोबर रोजी ६ जण आणि ५ ऑक्टोबर रोजी पुन्हा २४ रुग्णांचा मृत्यू झाला. अशा प्रकारे मागील ४ दिवसांत तब्बल ५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी आता रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एस.आर. वाकोडे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या रुग्णालयात औषधांच्या तुटवड्यामुळे मृत्यू होत असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणाची राज्य सरकारने चौकशी सुरु केली आहे.
Join Our WhatsApp Community