राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचे लेटरहेड तयार करून त्याच्यावर बनावट स्वाक्षरी (Cyber Crime) करून सरकारी कार्यालयांना फडणवीस यांच्या खाजगी सचिवांच्या ईमेल वरून पत्रव्यवहार करणाऱ्या एकाला सांगलीतून अटक करण्यात आली आहे.
महंमद इलियास याकूब मोमीन (४०) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. महंमद इलियास हा सांगली जिल्ह्यातील मिरज येथे राहणारा आहे. खाजगी कंत्राटे घेणाऱ्या महंमद इलियास याला महाराष्ट्र सायबरच्या नोडल सायबर पोलीस ठाण्याने अटक केली आहे.
(हेही वाचा-Shortage of Medicine : एफडीएने म्हणते औषध तुटवड्याची जबाबदारी आमची नाही)
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खाजगी सचिव विद्याधर महाले यांचा बनावट ईमेल आय डी तयार करून त्या बोगस ई मेल आयडी वरून राज्य शासनाच्या सेवेतील अधिकारी आणि कर्मचारी यांना उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या नावाने व त्यांची बनावट स्वाक्षरी करून पत्र पाठविण्यात आले होते, या पत्रात अधिकारी आणि कर्मचारी यांच्या बदल्यांचे आदेश देण्यात आले होते.
हे बनावट पत्र असल्याचे समोर आल्यानंतर या प्रकरणी महाराष्ट्र सायबर विभाग या ठिकाणी तक्रार दाखल करण्यात आली होती, या तक्रारी वरून महाराष्ट्र सायबर विभागाने नोडल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन सांगली च्या मिरज येथून महंमद इलियास मोमीन याला अटक करण्यात आली आहे. महंमद इलियास याने इंटरनेटचा वापर करून हे पत्र तयार केले होते, मात्र यामागचा त्याचा नेमका उद्देश अद्याप स्पष्ट झालेला नसून तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community