होआंगझाओ इथं सुरू असलेल्या आशियाई खेळांचा (Asian Games 2023) आज म्हणजेच गुरुवार ५ ऑक्टोबर हा बारावा दिवस आहे. अशातच आज भारताने आपलं २१ वं सुवर्ण पदक जिंकलं आहे. तिरंदाजीत आज पुन्हा भारताने बाजी मारली आहे. दक्षिण कोरियाचा पराभव करत मराठमोळ्या ओजस देवताळे याने सुवर्ण पदक पटकावलं आहे.
अधिक माहितीनुसार, तीरंदाज ओजस देवताले, अभिषेक वर्मा (Asian Games 2023) आणि प्रथमेश जावकर यांनी दक्षिण कोरियाचा पराभव करत भारताला गोल्ड मिळवून दिले. भारताच्या टीमने 235-230 असा विजय मिळवला. फायनल सामन्यात अभिषेक, ओजस आणि प्रथमेश यांनी शानदार प्रदर्शन केले.
मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून कौतुक
लक्ष्याचा अचूक वेध घेत भारतीय पुरुष चमूने मोठ्या अभिमानाने तिरंगा (Asian Games 2023) फडकविला. ओजस प्रवीण देवताळे, अभिषेक वर्मा आणि प्रथमेश जावकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा. अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले आहे.
भारतीय तिरंदाजांनी चीन येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजी विभागातील पुरुष कंपाउंड सांघिक गटात सुवर्णपदक पटकावले आहे. ओजस प्रवीण देवतळे, अभिषेक वर्मा आणि प्रथमेश जावकर या भारतीय त्रिकुटाने अंतिम फेरीत दक्षिण कोरियन प्रतिस्पर्ध्यांवर अटीतटीच्या लढतीत रोमहर्षक विजय… pic.twitter.com/MS29051XeA
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 5, 2023
(हेही वाचा – Asian Games 2023 : भारताच्या पदरात २० वं सुवर्ण पदक; दिनेश कार्तिकच्या पत्नीची कमाल)
त्यामुळे आता भारताच्या (Asian Games 2023) खात्यात २१ सुवर्ण, ३१ रौप्य आणि ३२ कांस्यसह एकूण ८४ पदकं मिळवली आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community