Mental Health : गोंदिया जिल्ह्यात पाच महिन्यांत आढळले तब्बल २० हजार मानसिक रोगी

143
Mental Health : गोंदिया जिल्ह्यात पाच महिन्यांत आढळले तब्बल २० हजार मानसिक रोगी

गोंदियात मानसिक रूग्ण, झोप येत नाही, निराश वाटते, मानसिकग्रस्त, (Mental Health) वैफल्य, कौटुंबिक तणाव, प्रेम प्रकरण व कर्जाचे डोंगर अशा विविध कारणाने तणावात असलेली व्यक्ती आत्महत्येचा मार्ग पत्करीत आहे. संयम न बाळगता धीर सोडणाऱ्या व्यक्तींना आत्महत्या हाच एकमेव मार्ग दिसत असतो. तणावात असलेले ते परिस्थितीशी लढण्याचे धाडस सोडून आत्महत्येचा मार्ग पत्करीत असतात. कोविडकाळात अनेकांचे मानसिक आरोग्य बिघडले होते. अनेक जण कोविडच्या भीतीमुळे मनातून खचून गेले होते. मानसिक तणावात राहता राहता हजारो लोक मनोरुग्ण होऊ लागले आहेत. अशातच गोंदिया जिल्ह्यात अवघ्या पाच महिन्यांत तब्बल २० हजार २८१ लोकांना मानसिक आजार (Mental Health) असल्याचा खळबळजनक आकडा पुढे आला आहे.

गोंदिया जिल्ह्यात ऑरगॅनिक मेंटल डिसिज, दारूमुळे मानसिक रोगी होणे, स्मृतिभ्रंश, भीती वाटणे, दूधवीय आजार, स्किझोफ्रेनिया, उदासीनता, व्यसनाधीनता, अकस्मार (मिरगी), गतिमंद, (Mental Health) निद्रानाश व इतर अनेक प्रकारचे मानसिक आजार लोकांना होताना दिसत आहेत. गोंदियात सन २०२३ मधील एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांची परिस्थिती पाहता तब्बल २० हजार २८१ जण मानसिक रुग्ण असल्याची आकडेवारी पुढे आली आहे. कोरोनापासून ही आकडेवारी झपाट्याने वाढत आहे. याहूनही अधिक मानसिक रुग्ण (Mental Health) असून, या रुग्णांच्या चार पट मानसिक रोगी जिल्ह्यात असल्याचे समजते.

(हेही वाचा – Mohammad Faisal : निवडणूक आयोगातील सुनावणीपूर्वी शरद पवारांना जोरदार झटका; खासदार मोहम्मद फैजल निलंबित)

गोंदिया जिल्ह्यात जिल्हा रुग्णालय व मेडिकल कॉलेजने २०६१ रुग्णांवर (Mental Health) उपचार केले. जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयाने ४६५ रुग्णांवर, मेडिकल कॉलेजच्या आयपीडीमध्ये ३२६, रुग्ण, तर जिल्ह्यातील ४० प्राथमिक आरोग्य केंद्रांतून १७ हजार ४२९ जणांवर मानसिक उपचार सुरू आहेत. अवघ्या पाच महिन्यांत २० हजार २८१ जणांना मानसिक आजार (Mental Health) असल्याचे समोर आले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.