Dhule Police : डीजेच्या आवाजामुळे १५ पोलिसांना कर्णदोष

156
Dhule Police : डीजेच्या आवाजामुळे १५ पोलिसांना कर्णदोष
Dhule Police : डीजेच्या आवाजामुळे १५ पोलिसांना कर्णदोष

काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या व्हायरल पोस्ट मध्ये गणपतीच्या मिरवणुकीत डीजे,डॉल्बी ह्यांच्या आवाजच्या कर्कश्श पातळीमुळे हृदय बंद पडणं आणि मृत्यू येणं, किंवा तात्कालिक किंवा कायमचं बहिरेपण येणं, किंवा गेले काही वर्ष तर मिरवणुकीच्या दरम्यान लेझर लाईटमुळे अनेकांची दृष्टी जाणं हे प्रकार वाढले आहेत. तर धुळ्यात १५ पोलीस कर्मचाऱ्यांना कर्णदोष झाल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. विसर्जन मिरवणुकीनंतर पोलीस कर्मचाऱ्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आली आहे. (Dhule Police)

गेल्या काही दिवसांपूर्वी विघ्नहर्ता मिळाला याचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि धुमधडाक्यात राज्यात पार पडला. दुसरीकडे गणेश विसर्जनानंतर डीजेवर लावण्यात आलेल्या लेझर शोमुळे अनेकांना डोळ्यांचा त्रास सुरू झाला आहे. अनंत चतुर्दशीला गणेशोत्सव मिरवणूक मोठ्या आनंदात पार पडली. आपल्या लाडक्या गणरायाला भक्तांनी आनंदात विसर्जित केलं. यामध्ये ढोल ताशासह आता सध्या डीजेचा ट्रेंड पडला आहे. याच्या गजरात नाचत, थिरकत गणपती बाप्पा ला निरोप दिला गेला! पण, त्यामुळे अनेकांना असह्य वेदना सहन कराव्या लागत आहे.गणेश विसर्जनावेळी बंदोबस्तावर असणाऱ्या या कर्मचाऱ्यांनी खाजगी रुग्णालयात उपचार घेतले असून यामुळे कायदा सुव्यवस्था सांभाळणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना डीजेच्या त्रासाला सामोरे जावे लागल्याने आता यावर पोलीस प्रशासन काय कारवाई करत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

(हेही वाचा : Mental Health : गोंदिया जिल्ह्यात पाच महिन्यांत आढळले तब्बल २० हजार मानसिक रोगी)

तक्रारी मोठ्या प्रमाणावर वाढल्या
गणेश विसर्जनानंतर अनेकांना कानांचा आणि डोळ्यांचा त्रास सुरू झाल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. त्यात काही पोलीस कर्मचाऱ्यांनी देखील आपल्याकडे डॉक्टर संजय देवरे यांनी दिली असून तानाजी आवाज मर्यादा ही ओलांडल्याने अशा प्रकारच्या समस्या निर्माण होतात. यामुळे नागरिकांनी डीजे पासून शंभर फूट अंतरावर दूर राहावे तसेच प्रशासनाने देखील डीजे वर बंदी आणावी अशी मागणी कर्ण रोग तज्ञ डॉक्टर संजय देवरे यांनी यावेळी केली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.