Sharad Pawar : शरद पवार यांनी घेतला भाजप आणि अजित पवार यांचा समाचार

187
Sharad Pawar : शरद पवार यांनी घेतला भाजप आणि अजित पवार यांचा समाचार
Sharad Pawar : शरद पवार यांनी घेतला भाजप आणि अजित पवार यांचा समाचार

भारतीय जनता पक्षाची लोकप्रियता कमी होत चालली आहे. दोन चार राज्ये सोडली तर अन्य राज्यांमध्ये अन्य पक्षांचे सरकार आहे. यामुळे, आगामी काळातील निवडणुकांमध्ये जनता भाजपचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही, असे मत शरद पवार यांनी गुरुवार, ०५ ऑक्टोबर रोजी व्यक्त केले. निवडणूक आयोगाने उद्या शुक्रवार दि. ६ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा खरा अध्यक्ष कोण? या मुद्यावर सुनावणी ठेवली आहे. तत्पूर्वी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) विस्तारात कार्यसमितीची बैठक आज दिल्लीतील कॉस्टीट्यूशन क्लबमध्ये बोलाविण्यात आली होती. यावेळी बोलताना शरद पवार यांनी भाजप आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा समाचार घेतला. (Sharad Pawar)

ते म्हणाले की, भारतीय जनता पक्षावरील लोकांचा विश्वास आता कमी होत चालला आहे. मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेश ही दोन मोठी राज्यं सोडली तर कोठेही भाजपचे सरकार नाही. महाराष्ट्रातील शिंदे सरकार हे आधीचे सरकार पाडून बनलेले आहे. यामुळे भाजपवरचा लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे हे सिध्द होते, असे ते म्हणाले. शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही समाचार घेतला. ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मुळातच भ्रष्ट पक्ष आहे असा आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला होता. परंतु, ज्यांचे नाव घेऊन हा आरोप केला होता त्यांनाच आपल्यासोबत घेतले आणि उपमुख्यमंत्री बनविले, असे ते म्हणाले. आधीचे पंतप्रधान आणि आताचे पंतप्रधान यात खूप मोठा फरक आहे. केंद्रीय तपास संस्थांचा वापर विरोधकांना त्रास देण्यासाठी होत आहे. (Sharad Pawar)

(हेही वाचा – Dhule Police : डीजेच्या आवाजामुळे १५ पोलिसांना कर्णदोष)

आगामी काळात पाच राज्यांत विधानसभा आणि त्यानंतर लोकसभेची निवडणूक आहे. यात देशाची जनता भाजपला खरी जागा दाखवेल, असेही ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी मिळून एकमताने माझी अध्यक्षपदी निवड केली आहे. ठरावावर सर्वांच्या सह्या आहेत. परंतु, आता ते माझी निवड बेकायदेशीर असल्याचे सांगत आहे. निवडणूक आयोगाकडे आपण सर्व दस्तावेज सोपविले आहेत. यामुळे आयोग दुधाचे दुध आणि पाण्याचे पाणी करतील, असा विश्वास पवार यांनी यावेळी बोलून दाखविला. दरम्यान, निवडणूक आयोगाने कोणताही निकाल दिला तरी घाबरण्याचे कारण नाही. मी पाचवेळा वेगवेगळ्या चिन्हांवर लढलो आणि जिंकून आलो. बैल, हात, गाय वासरू, चरखा आणि घड्याळ या चिन्हांवर मी निवडून आलो. निवडणूक चिन्ह काढून घेतले की आपण जिंकू असे काही लोकांना वाटत असेल. परंतु, चिंता करण्याची गरज नाही. भाजपला जनता योग्य ती जागा दाखवेल, असेही ते म्हणाले. (Sharad Pawar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.