ICC world Cup 2023 : हायड्रेटेड रहा आणि खेळांचा आनंद घ्या, बिसिसिआयचे सचिव जय शहा काय म्हणाले त्यांच्या ट्विट मध्ये

98

सध्या ऑक्टोबर हिट सुरु आहे त्यातच क्रिकेट वर्ल्ड कप सुरु झाला आहे. याच पार्श्वभूमीवर बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी एका ट्विट द्वारे एक घोषणा केली आहे. ज्यामध्ये वर्ल्ड कपच्या प्रत्येक सामन्यात प्रत्येक स्टेडियम मधल्या प्रेक्षकांना मोफत मिनरल वॉटर देण्याची घोषणा केली आहे. तर हायड्रेटेड रहा आणि खेळांचा आनंद घ्या!” असेही त्यांनी त्यांच्या ट्विट मध्ये म्हणले आहे. ( ICC world Cup 2023)

क्रिकेट वर्ल्ड कप दरम्यान भारताच्या अर्थव्यवस्थेत तब्बल २२० अब्ज रुपयांची भर पडणार आहे. पहिला सामना हा न्यूझीलंड (ENG vs NZ) संघांमधल्या लढाईनं या चषकाची सुरुवात झाली आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर सलामीचा सामना होणार आहे. दुपारी दोन वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. विश्वचषकाच्या या सामन्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. या दरम्यान बीसीआय सचिव जय शाह यांनी मोठी घोषणा केली आहे त्यांनी ट्वीट करुन सांगितले आहे की, “मला हे जाहीर करताना अभिमान वाटतो की आम्ही भारतभरातील स्टेडियममध्ये प्रेक्षकांसाठी मोफत मिनरल वॉटर देणार आहोत. ( ICC world Cup 2023)

(हेही वाचा : Dhule Police : डीजेच्या आवाजामुळे १५ पोलिसांना कर्णदोष

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.