देशातील पहिली सेमी-हायस्पीड ट्रेन वंदे भारत निळ्या आणि भगव्या रंगात रेल्वे रुळांवर धावत आहे. सध्या भारताच्या विविध भागात वंदे भारत एक्स्प्रेसच्या ३४ जोड्या धावत आहेत. दरम्यान, वंदे भारत एक्स्प्रेस निळ्या आणि भगव्या रंगात रेल्वे रुळांवर धावत आहे.त्याचबरोबर वंदे भारतावरही राजकारण सुरू आहे. मात्र रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. वंदे भारत ट्रेनचा रंग भगवा असण्याला शुद्ध वैज्ञानिक तर्क असल्याचे म्हटले आहे. यात कोणतेही राजकारण नसल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. (Vande Bharat Train)
अश्विनी वैष्णव म्हणाले की, विज्ञानानुसार मानवी डोळ्याला पिवळा आणि भगवा असे दोन रंग सहज दिसतात. यामुळेच युरोपमधील ८० टक्क्यांहून अधिक गाड्या एकतर भगव्या किंवा पिवळ्या रंगाच्या असतात. या दोन रंगांव्यतिरिक्त, चांदीसारखे आणखी काही रंग आहेत, जे पिवळ्या आणि भगव्यासारखे चमकदार आहेत, परंतु जर आपण आपल्या डोळ्यांबद्दल बोललो तर हे दोन रंग डोळ्यांसाठी सर्वोत्तम मानले जातात. याच कारणामुळे विमाने आणि जहाजांचे ब्लॅक बॉक्स देखील भगव्या रंगाचे असतात. तसेच, एनडीआरएफने वापरलेल्या रेस्क्यू बोटी, लाईफ जॅकेट यासारख्या गोष्टीही भगव्या रंगाच्या असतात, असे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. दरम्यान, सध्या देशात अनेक वंदे भारत एक्सप्रेस धावत आहे. या रेल्वेत आरामदायक खुर्ची आणि इतर अनेक सुविधा आहेत. वाढता प्रतिसाद पाहून रेल्वेने स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस सुद्धा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. (Vande Bharat Train )
(हेही वाचा : Sharad Pawar : शरद पवार यांनी घेतला भाजप आणि अजित पवार यांचा समाचार)
Join Our WhatsApp Community