Pension Adalat : पालकमंत्र्यांच्या ‘पेन्शन अदालत’मध्ये पहिल्याच दिवशी १२९ निवृत्त कर्मचाऱ्यांची सुनावणी

287
Pension Adalat : पालकमंत्र्यांच्या ‘पेन्शन अदालत’मध्ये पहिल्याच दिवशी १२९ निवृत्त कर्मचाऱ्यांची सुनावणी
Pension Adalat : पालकमंत्र्यांच्या ‘पेन्शन अदालत’मध्ये पहिल्याच दिवशी १२९ निवृत्त कर्मचाऱ्यांची सुनावणी

मुंबई महानगरपालिकेच्या विविध आस्थापनांमधून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी गुरुवारी ५ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याद्वारे महापालिकेच्या मुख्यालयात पहिल्यांदाच ‘पेन्शन अदालत’ चे आयोजन करण्यात आली होती. या पहिल्या पेन्शन अदालतमध्ये १२९ निवृत्त कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला. त्यामुळे प्रत्यक्ष सुनावणी झालेल्या १२९ निवृत्त कर्मचाऱ्यांची समस्या पुढील महिन्यांत सुटली जाऊन त्यांच्या खात्यात पैसे जमा होतील. तर यापूर्वीपासून पालकमंत्र्यांनी हाताळलेल्या अशाप्रकारच्या प्रकरणांपैंकी २५० निवृत्त कर्मचाऱ्यांचे दावे निकालात निघाले असून पुढील आठ दिवसांमध्ये त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे. (Pension Adalat)

मुंबई महानगरपालिकेच्या २४ विभागातुन संबंधीत प्रशासकीय अधिकारी, घनकचरा व्यवस्थापन ए ते टी विभातील प्रशासकीय अधिकारी, के. इ. एम, राजावाडी, लोकमान्य टिळक रुग्णालय सायन, नायर रुग्णालय, कूपर रुग्णालय येथील प्रशाकीय अधिकारी, उपशिक्षणाधिकारी व इतर संबंधित मुख्य अधिकाऱ्यांसह प्रभारी उपायुक्त (वित्त विभाग) व लेखापाल (कोषागार) यांच्या उपस्थितीत उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महापालिका निवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनासंदर्भातील प्रश्न आणि अडचणी निकालात काढण्यासाठी पेन्शन अदालतचे आयोजन गुरुवारी दुपारी करण्यात आले होते. या पेन्शन अदालतमध्ये गुरुवारी १२९ लोकांनी प्रत्यक्षात सहभाग घेतला. दुपारी दोन वाजता सुरु झालेल्या पेन्शन अदालतमध्ये संध्याकाळी पावणे पाच वाजेपर्यंत १२९ निवृत्त कर्मचाऱ्यांची लोढा यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांसमक्ष सुनावणी घेऊन प्रत्यक्षातील संबंधित खात्याच्या तसेच पेन्शन विभागाच्या अडचणी काय आहे? का त्यांचे पेन्शन अडले गेले याची माहिती घेऊन त्यासर्वांचे दावे त्वरीत निकालात काढण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. त्यानुसार प्रशासनाने संबंधितांची कार्यवाही पूर्ण करून पुढील ३० ते ६० दिवसांमध्ये त्यांचे दावे निकालात काढले जातील अशी ग्वाही दिली. (Pension Adalat)

तर यापूर्वीपासून लोढा यांच्याकडे प्राप्त झालेल्या तक्रारींनुसार तसेच त्यांनी वर्ग केलेल्या अशा प्रकरणांबाबत पेन्शन विभागाने कार्यवाही पूर्ण केल्यानंतर बुधवारी या विभागाच्या माध्यमातून एकूण २५० दावे निकालात काढण्यात आले. लोढा यांनी हे प्रकरण हाती घेतल्यानंतर पेन्शन विभाग कामाला लागले असून त्यांनी गुरुवारपर्यंत २५० प्रकरणे निकालात काढल्यामुळे पुढील आठ दिवसांमध्ये त्यांच्या बँक खात्यात याचे पैसे जमा होणार आहे. मुंबई महापालिकेच्या सुमारे ३ हजारांहून अधिक निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन अडकले आहेत. त्यामुळे ऑगस्ट २०२२ ते १२ सप्टेंबर २०२३ पर्यंत लेखापाल (कोषागार) यांच्या माध्यमातून पेन्शन अदालतीच्या माध्यमातून १६९ निवृत्त कर्मचाऱ्यांची सुनावणी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. याशिवाय २४ विभाग कार्यालय निहाय तसेच खातेनिहाय ९७ पेन्शन अदालतींचे आयोजन केले होते. तरीही निवृत्त कर्मचाऱ्यांच्या समस्या कायम असून पालकमंत्र्यांच्या पहिल्याच पेन्शन अदालत मध्ये १२८ निवृत्त कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे. शिवाय शुक्रवारीही या पेन्शन अदालतचे आयोजन केले असून सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ही अदालत चालणार आहे. त्यामुळे शुक्रवारी मोठ्याप्रमाणात महापालिका निवृत्त कर्मचाऱ्यांची संख्या वाढेल असा विश्वास लोढा यांनी व्यक्त केला आहे. (Pension Adalat)

(हेही वाचा – Maharashtra : दिल्लीतील महाराष्ट्र परिचय केंद्र बंद पडणार? कारण…)

प्रसंगी बोलतांना पालकमंत्री लोढा म्हणाले “महानगरपालिकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काच्या पेन्शनसाठी वारंवार पाठपुरावा करावा लागत होता. त्यांच्या उदरनिर्वाहासाठी आवश्यक असे कष्टाने कमावलेले पेन्शन त्यांना सहज उपलब्ध होत नाही हे लक्षात घेऊन आम्ही पेन्शन अदालत सुरु करण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून मुंबईतील किंबहुना संपूर्ण महाराष्ट्रातील प्रथम पेन्शन अदालत गुरुवारी मुंबई महानगरपालिकेत आयोजित करण्यात आली. या पेन्शन अदालत च्या माध्यमातून सर्व कर्मचाऱ्यांच्या पेन्शन संदर्भातील समस्या कोणताही वेळ न दवडता सोडवण्याचा आमचा प्रयत्न आहे. यात कर्मचाऱ्यांचा मिळालेला प्रतिसाद आणि त्यांच्या हक्काचे पेन्शन मिळाल्याने त्यांना झालेला आनंद बघून समाधान वाटले” उपस्थितांनी आपल्या समस्या मांडण्याची संधी दिल्याबद्दल आणि तक्रारींचे तात्काळ निराकरण केल्याबद्दल पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे आभार मानले. पेन्शन अदालत ६ ऑक्टोबर २०२३ रोजी देखील आयोजित करण्यात आली असून सकाळी १० वाजता या सभेची सुरुवात होईल आणि सायंकाळी ५ वाजता सभेची सांगता होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. (Pension Adalat)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.