उत्तर प्रदेशात आयकर विभागाने छापेमारी केली आहे, त्यामध्ये समाजवादी पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष अबू आसिम आझमी (Abu Azami) यांचा संबंध असलेल्या काही ठिकाणांचा समावेश आहे. त्यामुळे आझमी यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
आयकर विभागाने मुंबई आणि दिल्लीत ही छापेमारी केली.
एप्रिल महिन्यात अबू आझमी (Abu Azami) यांना १६० कोटी रुपयांच्या कारचोरी प्रकरणी आयकर विभागाने समन्स बजावले. प्राप्तिकर विभागाने वाराणसीच्या विनायक ग्रुपची चौकशी सुरु केल्यानंतर आझमी यांच्या त्याचे धागेदोरे सापडले. विनायक ग्रुप वाराणसीच्या अनेक इमारती, शॉपिंग सेंटर, मॉल्स आणि निवासी उंच इमारती बांधल्या आहेत. कागदोपत्री विनायक ग्रुपमध्ये तीन भागीदार होते. त्यात सर्वेश अग्रवाल, समीर दोशी आणि आभा गुप्ता असा त्याचा समावेश आहे. आभा गुप्ता या दिवंगत गाणेच गुप्ता यांच्या पत्नी आहेत, गणेश गुप्ता हे आझमींचे (Abu Azami) जवळचे मित्र असल्याचे सांगितले जात आहे. गणेश गुप्ता महाराष्ट्रात समाजवादी पक्षाचे सरचिटणीस होते आणि कुलाबा येथील आझमी यांच्या इमारतीतून त्यांचे कार्यालय चालवत होते.
(हेही वाचा Nanded : नांदेडमध्ये मृत्यूचे सत्र सुरूच; ४ दिवसांत ५० च्या वर मृत्यू)
Join Our WhatsApp Community