Senior Citizen : मुंबईत ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारणार; दीपक केसरकर यांची माहिती

137
special Ishwari

भारतीय संस्कृतीत ज्येष्ठ नागरिकांचे स्थान नेहमीच मानाचे राहिले आहे. कारण ते परिवाराचा आधारवड असतात. ज्येष्ठांना त्यांच्या उर्वरित आयुष्यात सुरक्षित, आरोग्य सुविधायुक्त वातावरण देण्यासाठी राज्य सरकार कायम त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे मुंबई शहरात महिनाभरात ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी गुरुवारी (०५ ऑक्टोबर) रोजी सांगितले. (Senior Citizen)

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना केसरकर यांनी अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या धर्तीवर ज्येष्ठ नागरिकांसाठी मुंबईत विरंगुळा केंद्र सुरू करण्यात येणार असून ज्येष्ठांना ने-आण करण्यासाठी स्वतंत्र बसची व्यवस्था करण्यात येईल, असे सांगितले. (Senior Citizen)

(हेही वाचा – Dhananjay Munde : शेतकऱ्यांना ८ दिवसांत भरपाई न दिल्यास पिक विमा कंपन्यांवर कारवाई; कृषीमंत्री मुंडे यांचा इशारा)

या केंद्रात ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या आवडीनुसार दिवस घालवता येईल. शाळांमध्ये आजी-आजोबा दिवस हा उपक्रम आपण सुरू केला. यानिमित्त राज्यभर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. राज्य सरकारने पंच्याहत्तर वर्षांवरील नागरिकांना मोफत एसटी प्रवास सवलत सुरू केली आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या अर्थसहाय्यात वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती केसरकर यांनी यावेळी दिली. (Senior Citizen)

यावेळी ८० वर्षांवरील आजी-आजोबांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी उल्लेखनीय काम करत असलेल्या फेस्कॉम, हेल्पेज इंडिया, जनसेवा फाऊंडेशन या संस्थांचाही सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला आमदार सदा सरवणकर, आमदार देवराव होळी, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, समाज कल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, सहसचिव दि. रा. डिंगळे, ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे आदी उपस्थित होते. (Senior Citizen)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.