Ajit Pawar : कोल्हापूर शेंडापार्क येथे आयटी पार्क उभारा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

192
लाडकी बहीण योजनेत काही कमी पडू देणार नाही; DCM Ajit Pawar यांची ग्वाही

कोल्हापुरात संगणक, माहिती तंत्रज्ञान उद्योगांची वाढ व्हावी, स्थानिक युवकांना रोजगार मिळावा यासाठी शेंडापार्क परिसरात आयटी पार्क उभारण्यात यावे. त्यासाठी शेंडापार्क येथील आयटी पार्कसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाची ३० हेक्टर जागा उपलब्ध करून द्यावी. या जागेच्या बदल्यात कृषी विद्यापीठास त्यांच्या विविध प्रकल्पांसाठी शहरा लगतची ५० हेक्टर जागाही द्यावी, असे सक्त निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी मंत्रालयात आयोजित एका बैठकीत दिले. (Ajit Pawar)

या बैठकीला वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, कृषीमंत्री धनंजय मुंडे, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी.  पाटील, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितिन करीर, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहूल रेखावार (व्हीसीद्वारे), एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन शर्मा (व्हीसीद्वारे) आदी मान्यवर उपस्थित होते. (Ajit Pawar)

(हेही वाचा – Beauty Tips : चेहऱ्यावर तेज येण्यासाठी स्ट्रॉबेरीचा करा वापर)

कोल्हापूरची वाढती लोकसंख्या आणि शहरीकरणाचा वेग लक्षात घेता येथील विद्यार्थी, युवकांना स्थानिक परिसरात रोजगार उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यासाठी शहरातील शेंडापार्क येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाची ३० हेक्टर जागा आयटीपार्कसाठी उपलब्ध करुन द्यावी. यामुळे विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाच्या आणि तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. आयटी पार्कसाठी कृषी विद्यापीठाची मोकळी ३० हेक्टर जागा देताना, विद्यापीठाला पर्यायी ५० हेक्टर जागा उपलब्ध करून द्यावी.तसेच शहरातील या क्षेत्रापासून विमानतळ आणि पुरेशा नागरी सुविधा उपलब्ध असल्याने आंतरराष्ट्रीय कंपन्यांची गुंतवणूक वाढण्यास मदत होणार आहे. आंतरराष्ट्रीय कंपन्यांना पुण्यानंतर कोल्हापूर हा चांगला पर्याय असून आयटी पार्कची उभारणी निश्चित कालमर्यादेत करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी दिले. दरम्यान, कोल्हापूर शहरात असलेले शासकीय आयटी पार्क पूर्ण क्षमतेने सुरू करण्याच्या प्रक्रियेस तातडीने गतीही द्यावी,असेही निर्देश उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी दिले. (Ajit Pawar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.