मुंबईत गोरेगावमधील इमारतीच्या पार्किंगमध्ये भीषण आग लागली. (Mumbai Fire) गोरेगाव पश्चिमेकडील जी रोडवरील जय भवानी इमारतीला ही आग लागली होती. पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत आतापर्यंत ७ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे, तर ४० जण जखमी झाले आहेत. ३० जणांना सुखरुप वाचवण्यात यश आले आहे. या आगीत तळमजल्यावर वरील काही दुकाने आणि समोर पार्क असलेल्या गाड्या जळून खाक झाल्याची माहिती देखील मिळत आहे. दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले असून सध्या कुलिंगचे काम सुरु आहे. (Mumbai Fire)
(हेही वाचा – Health Tips : जीभ भाजली असेल तर ‘हे’ करा)
ग्राउंड प्लस ७ मजल्याची ही इमारत होती. १५ वर्षापूर्वी ही इमारत बांधण्यात आली होती. यात ६३ कुटुंबे रहात होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळ गाठून आग विझवण्याचा प्रयत्न केला. या आगीत अडकलेल्या ३० पेक्षा अधिक नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आला आहे, तर १४ जण या आगीमध्ये जखमी झाले आहेत. ही आग लेवल २ प्रकारची असल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाने दिली आहे. ही आग पहाटे साडे सहाच्या दरम्यान आटोक्यात आली. जखमींना अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ बाहेर काढून मुंबईच्या ट्रॉमा केअर आणि कुपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. (Mumbai Fire)
यामध्ये बहुतांश कुटुंबे ही कपड्यावर भांडी विक्रीचा व्यवसाय करणारी आहेत. त्यामुळे त्यांनी त्या कपड्यांचे सामान बांधून घराबाहेर आणि मोकळ्या जागेत ठेवले होते. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार ही आग शॉर्टसर्किटने लागल्यानंतर तिथे असलेल्या दुचाकी गाडीनेही पेट घेतला. तिथे असलेल्या कपड्यांमुळे आग पसरल्याचे स्थानिकांनी सांगितले. या घटनेनंतर प्रमुख विभागाचे सहाय्यक आयुक्त, महापालिकेचे उपायुक्त, स्थानिक आमदार विद्या ठाकूर, अग्निशामन दलाचे प्रमुख अधिकारी, अतिरिक्त आयुक आश्विनी भिडे आदींनी घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याची माहिती घेतली. दरम्यान १० वाजता महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल हे घटनास्थळाची पहाणी करण्यासाठी जात आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community