शिवसेना आमदार अपात्रता (MLA Disqualification Case) प्रकरणचा निकाल कधी आणि केव्हा लागतो याकडेच सर्वांचेच लक्ष लागले आहे. असे असताना शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार पात्र की अपात्र, याबाबत सुप्रीम कोर्टात येत्या ६ ऑक्टोबर रोजी सुनावणी पार पडणार होती. मात्र आता पुन्हा एकदा ही सुनावणी लांबणीवर गेली आहे. एकूण चौथ्यांदा ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाचं टेन्शन वाढलं आहे.
अधिक माहितीनुसार, सत्ता संघर्षाची (MLA Disqualification Case) सुनावणी आता थेट ३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. याआधी सर्वोच्च न्यायालयाकडून या प्रकरणावरील सुनावणीसाठी ३ ऑक्टोबर, मग ६ ऑक्टोबर आणि त्यानंतर ९ ऑक्टोबर अशी तारीख देण्यात आली होती. त्यानंतर आता थेट ३ नोव्हेंबर ही तारीख देण्यात आली आहे. मात्र काही तज्ज्ञांच्या माहितीनुसार महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल यावर्षी लागण्याची शक्यता कमीच आहे.
(हेही वाचा – Mumbai High Court : नियमांचे पालन करा; ‘या’ वयानंतर अनुकंपा नोकरी नाही – मुंबई उच्च न्यायालय)
मागील सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयानं (MLA Disqualification Case) विधानसभा अध्यक्षांना या सुनावणीबाबत एक निश्चित वेळापत्रक तयार करण्यास सांगितलं होतं. त्यानुसार, विधानसभा अध्यक्षांनी याप्रकरणावरील सुनावणीसाठी एक निश्चित वेळापत्रक तयारही केलं होतं. या वेळापत्रकानुसार आमदार अपात्रतेची सुनावणी 13 ऑक्टोबरला होणार आहे. एकीकडे विधानसभा अध्यक्षांनी अपात्रतेबाबत कारवाईसाठी वेळापत्रक ठरवलेलं असताना सुप्रीम कोर्टाची तारीख सातत्याने लांबणीवर जात आहे. त्यामुळे अध्यक्षांच्या वेळापत्रकाला सुप्रीम कोर्टाने अप्रत्यक्ष मान्यताच दिल्याची चर्चा सध्या रंगत आहे.
दरम्यान अपात्र (MLA Disqualification Case) आमदारांच्या सुनावणीबाबतीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप करत ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community