ICC ODI World Cup : भारतीय संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध तीन फिरकी गोलंदाज खेळवणार?

105
ICC ODI World Cup : भारतीय संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध तीन फिरकी गोलंदाज खेळवणार?
ICC ODI World Cup : भारतीय संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध तीन फिरकी गोलंदाज खेळवणार?
  • ऋजुता लुकतुके

भारतीय संघाचा पहिला सामना चेन्नईच्या चिदंबरम स्टेडिअमवर ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणार आहे आणि या सामन्यासाठी अश्विन, जाडेजा आणि कुलदीप असे तिघे फिरकी गोलंदाज एकाच वेळी संघात दिसले तर आश्चर्य वाटून घेऊ नका. भारतीय क्रिकेट संघ एकदिवसीय विश्वचषकाची आपली मोहीम येत्या रविवारी ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरू करेल. त्या आधीचे संघाचे दोन्ही सराव सामने पावसात वाहून गेले. गुवाहाटी आणि मग थीरूअनंतपुरम अशा दोन्ही ठिकाणी पावसामुळे एकही चेंडू टाकला गेला नाही. पण, त्यामुळे भारतीय संघ फलंदाजीचा क्रम नेमका काय ठेवतो आणि गोलंदाजांची कुठली कुमक मैदानात उतरवतो, याचा अंदाजच बांधता आला नाही. (ICC ODI World Cup)

आता संघ चेन्नईत पोहोचला आहे. आणि इथल्या दुसऱ्या सराव सत्रावरून तरी असं दिसतंय की ऑस्ट्रेलिया विरुद्ध अश्विन, रवी जाडेजा आणि कुलदीप यादव हे तीनही फिरकी गोलंदाज खेळू शकतात. इतकंच नाही तर जसप्रीत बुमराने गोलंदाजी बरोबरच चांगली ५० मिनिटं फलंदाजीचाही सराव केला. थोडक्यात, ऑस्ट्रेलिया विरुद्ध तळाच्या फलंदाजांची ढेपाळलेली कामगिरी यावेळी संघ प्रशासनाने चांगलीच मनावर घेतलीय. सरावासाठी भारतीय संघाने जलदगती, फिरकी आणि थ्रोअवे अशी तीन नेट्स तयार केली आहेत. आणि बुमराने या तीनही नेट्समध्ये वेळ घालवला. दोन वर्षांपूर्वी लॉर्ड्स कसोटीत बुमराने आपलं फलंदाजीतील कौशल्य थोडंफार दाखवून दिलं होतं. त्यामुळे ९ व्या क्रमांकाच्या या फलंदाजाने गरज पडल्यास फलंदाजीतही हातभार लावावा असं प्रशासनाला आता वाटतंय. (ICC ODI World Cup)

(हेही वाचा – Asian Games 2023 : क्रिकेटमध्ये आणखी एक पदक निश्चित, बांगलादेशचा ९ गडी राखून पराभव करत भारतीय संघ अंतिम फेरीत)

बुमराबरोबर सगळ्यात गोलंदाजांनी नेट्समध्ये फलंदाजीचा सराव केला. नेट्सची सुरुवात गोलंदाजांच्या फलंदाजी सरावानेच झाली. आणि यात बुमराच्या मागोमाग नेट्समध्ये उतरला तो अश्विन. सध्या अश्विनचं पुनरागमन गाजतंय. फलंदाजीतही तो उपयोगी पडू शकतो. त्याची सरासरी १६ धावांची आहे. पण, फलंदाजीपेक्षा अश्विनची संघाला गरज आहे ती ऑफ-स्पिन गोलंदाजीत. ऑस्ट्रेलियन फलंदाज ऑफ-स्पिन गोलंदाजीसमोर गडबडतात असा त्यांचा लौकीक आहे आणि नुकत्याच संपलेल्या भारतातील एकदिवसीय मालिकेतही तेच दिसलं. (ICC ODI World Cup)

अश्विनने दोन सामन्यांमध्ये महत्त्वाचे ४ बळी मिळवले. त्यामुळेच विश्वचषकात त्याचा समावेश झालाय आणि संघ प्रशासन जाडेजा (अष्टपैलू) आणि कुलदीप यादव यांच्या सोबत अश्विनला मैदानात उतरवण्याची दाट शक्यता आहे. चेन्नईत कडक उन्हाळा आहे आणि मैदानही बऱ्यापैकी कोरडं असेल. अशावेळी इथली खेळपट्टी फिरकी गोलंदाजीलाच साथ देणार असाही अंदाज आहे. अश्विनने गुरुवारी तब्बल तीन तास सराव केला. डावखुरे फलंदाज ऑफ-स्पिनला अडखळतात हे लक्षात घेऊन त्याने के एल राहुल आणि हार्दिक पांड्याला टिच्चून गोलंदाजी केली. अश्विनचा संघातील समावेश नक्की दिसत आहे. आता संघ प्रशासन अंतिम एकरा खेळाडूंमध्ये महम्मद शामीला खेळवतं की, कुलदीप चहलला हे पाहावं लागेल. (ICC ODI World Cup)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.