Tomato Rate : टोमॅटोचा पुन्हा चिखल; शेतकऱ्यांचा तीव्र संताप

197
Tomato Rate : टोमॅटोचा पुन्हा चिखल; शेतकऱ्यांचा तीव्र संताप
Tomato Rate : टोमॅटोचा पुन्हा चिखल; शेतकऱ्यांचा तीव्र संताप

नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये टोमॅटोला भाव मिळण्यासाठी आंदोलन करण्यात येत असून दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती आवारासमोर टोमॅटो रस्त्यावर फेकले. (Tomato Rate) यावेळी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शासनाच्या धोरणांचा निषेध नोंदवला. मागील काही जुलै, ऑगस्ट महिन्यात टोमॅटोला उच्चांकी भाव मिळत होता. मात्र सद्यस्थितीत टोमॅटो दहा रुपये किलोने विकला जात असल्याने शेतकरी तीव्र संताप व्यक्त करत आहेत. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी शासनाच्या धोरणाचा निषेध केला. शेतकऱ्यांच्या या आंदोलनामुळे नाशिक- कळवण रस्त्यावरील दिंडोरी बाजार समितीच्या आवारात काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. (Tomato Rate)

(हेही वाचा – National Sports Awards 2023 : पुरस्कारासाठी नोंदणी सुरु; ‘या’ ठिकाणी पाठवता येणार अर्ज)

नाशिक जिल्ह्यातील अनेक शेतकरी द्राक्ष पीक घेत होते, मात्र मागील वर्षी द्राक्षाला भाव मिळाला नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी द्राक्षबागा तोडून टोमॅटो पीक घेतले. एकट्या दिंडोरी तालुक्यात सुमारे सात हजार हेक्टरवर टोमॅटोची लागवड आहे. टोमॅटोसाठी शेतकऱ्यांना एकरी दीड लाखापर्यंत खर्च येतो. तेवढे उत्पन्न मिळत असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. (Tomato Rate)

उत्पादन खर्च निघणे मुश्किल

नाशिक जिल्ह्यात कांद्यापाठोपाठ टोमॅटोच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. गेल्या महिन्यात २०० रुपये किलो अशा चढ्या दराने विकल्या जाणाऱ्या टोमॅटोला आता १० रुपये किलो इतकी कमी किंमत मिळत असल्याचे चित्र आहे. सध्या प्रति जाळी ७० ते १०० रुपयांपर्यंत भाव मिळत असल्याने उत्पादन खर्च देखील निघणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी नाशिकच्या दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती आवारासमोर टोमॅटो रस्त्यावर फेकले. दोन दिवसांपासून ऊन वाढत असल्याने टोमॅटोची मोठ्या प्रमाणात आवक वाढली असल्याने भाव कोसळले असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरत टोमॅटोचा लाल चिखल केला. (Tomato Rate)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.