Indigo ticket hike: इंधन शुल्कामुळे इंडिगोच्या तिकिटात वाढ, जाणून घ्या…किती महागडा होणार प्रवास

91
Indigo ticket hike: इंडिगोच्या तिकिटात वाढ, जाणून घ्या...किती महागडा होणार प्रवास
Indigo ticket hike: इंडिगोच्या तिकिटात वाढ, जाणून घ्या...किती महागडा होणार प्रवास

वाढत्या एटीएफ किमतीची भरपाई करण्यासाठी इंडिगोनं गुरुवारी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गावर इंधन शुल्क लागू  केलं आहे. त्यामुळे इंडिगो एअरलाइन्सने आजपासून म्हणजेच ६ ऑक्टोबरपासून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान प्रवासासाठी फ्युअल चार्जेस (Fuel charges) लागू करणार आहे. यामुळे विमानाच्या तिकिटाच्या किमती सुमारे १००० रुपयांनी महाग (Indigo ticket hike) होणार आहेत. हे शुल्क संबंधित क्षेत्रातील अंतरावर अवलंबून असेल, अशी माहिती इंडिगो कंपनीकडून देण्यात आली आहे.

जेट इंधनाच्या किमतीत वाढ होत असताना हे पाऊल उचलण्यात आलं आहे. एअरलाईन्स २०१८ मध्ये शेवटचा इंधन अधिभार लावला होता, मात्र इंधनाच्या किमती कमी झाल्यानंतर हळूहळू तो काढून टाकण्यात आला होता. हे शुल्क ६ ऑक्टोबरपासून लागू केलं जाणार असल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे.

गेल्या तीन महिन्यांत सातत्याने एव्हिएशन टर्बाइन फ्युअलच्या (एटीएफ) किमतीमध्ये वाढ झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. एटीएफ हा एअरलाइनच्या ऑपरेटिंग खर्चाचा भाग आहे. त्यामुळे अशा खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी दरात वाढ करण्याची गरज असल्याचे इंडिगोने म्हटलं आहे. त्यामुळे किमतीत बदल झाल्यामुळे इंडिगो फ्लाइटचे बुकिंग करणाऱ्या प्रवाशांना सेक्टर अंतराच्या आधारे प्रति सेक्टर फ्युएल चार्ज भरावा लागेल.

अंतर आणि शुल्क (distance and charges )
– ५०० किमीपर्यंत अंतरासाठी ३०० रुपये इंधन शुल्क आकारले जाईल. अंतर वाढले की, १००० रुपयांपर्यंत वाढेल.
– ५०१ ते १००० किमी अंतरासाठी तिकिटावर अतिरिक्त ४०० रुपये दर आकारला जाईल.
– १००१ ते १५०० किमी अंतरासाठी तिकिट बुक करणाऱ्यांना अतिरिक्त ५५० रुपये मोजावे लागतील आणि १५०१ ते २५०० किमीसाठी ६५० रुपये आकारले जातील.
– २५०१ ते ३५०० किमी अंतरासाठी ८०० रुपये इंधन शुल्क आकारले जाईल. ३५०१ किमी पेक्षा जास्त अंतरासाठी १००० रुपये इंधन शुल्क आकारण्यात येणार आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.