Mumbai Fire : गोरेगावातील आगीच्या दुर्घटनेविषयी पंतप्रधान मोदी यांनीही व्यक्त केले दु:ख; केली ‘ही’ घोषणा

101
Mumbai Fire : गोरेगावातील आगीच्या दुर्घटनेविषयी पंतप्रधान मोदी यांनीही व्यक्त केले दु:ख; केली 'ही' घोषणा
Mumbai Fire : गोरेगावातील आगीच्या दुर्घटनेविषयी पंतप्रधान मोदी यांनीही व्यक्त केले दु:ख; केली 'ही' घोषणा

मुंबईतील गोरेगाव येथे घडलेल्या आगीच्या दुर्घटनेबद्दल स्वतः पंतप्रधान मोदी यांनीही दु:ख व्यक्त केले आहे. (Mumbai Fire) या आगीत ७ जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. ५० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून मृत व जखमींच्या कुटुंबीयांना मदत जाहीर केली आहे. (Mumbai Fire)

(हेही वाचा – Indians Earning : भारतीय श्रीमंत झाले; आर्थिक उत्पन्नात झपाट्याने वाढ )

‘मुंबईतील गोरेगाव इथं घडलेली दुर्घटना प्रचंड वेदनादायी आहे. अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. हा दुर्दैवी प्रसंग ओढवलेल्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. माझ्या सहवेदना त्यांच्या बरोबर आहेत. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना मी करतो. स्थानिक प्रशासन शक्य ती मदत करण्याचा प्रयत्न करीत आहे’, असे ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. आग दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या जवळच्या नातलगांना प्रत्येकी २ लाख तर जखमींना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल, अशी घोषणा पंतप्रधानांनी केली आहे. (Mumbai Fire)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून त्यात जीव गमवावा लागलेल्या नागरिकांप्रती मी माझी सहवेदना व्यक्त करतो, असे त्यांनी म्हटले आहे. ‘या आगीच्या घटनेबाबत मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांकडून मी वेळोवेळी माहिती घेत असून मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, तसेच मुंबई उपनगरांचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांना प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देण्याचे निर्देश दिले आहेत.

या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या रहिवाशांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून ५ लाख रुपयांची मदत दिली जाईल. तसेच जखमी नागरिकांवर सरकारी खर्चाने वैद्यकीय उपचार करण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली. (Mumbai Fire)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.