काही वर्षांपूर्वी मराठी रंगभूमीवर प्रचंड वादग्रस्त ठरलेला ‘नथुराम गोडसे’ पुन्हा रंगभूमीवर येत आहे. ’ हे नाटक नाट्यनिर्माते उदय धुरत यांनी १९९८साली माऊली प्रॉडक्शनतर्फे रंगभूमीवर आणले होते. या नाटकाचे दिग्दर्शन विनय आपटे यांनी केले होते. शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी त्यात नथुरामची भूमिका साकारली होती. त्यांची भूमिका लोकप्रिय ठरली होती. वादग्रस्त विषयामुळे हे नाटक खूप चर्चेत राहिले. माऊली प्रॉडक्शनचे उदय धुरत यांनी केलेल्या अर्जावर मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती देण्यास नकार दिली आहे.
या नाटकाच्या तालमी ३ ऑक्टोबरपासून सुरू झाल्या आहेत. या नाटकात ‘नथुराम’च्या भूमिकेत अभिनेता सौरभ गोखले दिसणार आहे. ‘नथुरामच्या भूमिकेतील कलाकाराचे नाव निश्चित झाल्यानंतर आता नाटकाच्या तालमी सुरू होत आहेत.
(हेही वाचा – Indigo ticket hike: इंधन शुल्कामुळे इंडिगोच्या तिकिटात वाढ, जाणून घ्या…किती महागडा होणार प्रवास)
अभिनेते शरद पोंक्षे या नाटकात प्रमुख भूमिकेत असून, नाटकाचे ५० प्रयोग होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. ७ ऑक्टोबरला गडकरी रंगायतनमध्ये या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग होत आहे. ‘व्याख्यानाच्या निमित्ताने फिरताना, हे नाटक मी पुन्हा करावे असा लोकांचा आग्रह होता. त्यामुळे ५० प्रयोग करण्याचा निर्णय आम्ही घेतला. त्यानंतर ‘नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाव मिळण्यासाठी मी सेन्सॉरकडे पत्र पाठवले. सेन्सॉरकडून ते मिळाले आहे’, अशी माहिती अभिनेता शरद पोंक्षे यांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community