बालसाहित्य, नाट्य आणि गद्य साहित्यातील अतुलनीय योगादानाबद्दल युरोपीय तथा नॉर्डिक लेखक जॉन फॉसे यांना साहित्याचा नोबेल पुरस्कार (Nobel Prize) जाहीर झाला आहे. नोबेल लिटरेचर कमिटीचे अध्यक्ष अँडर्स ऑल्सन यांनी या पुरस्काराची घोषणा केली आहे.
जॉन फॉसे (६४) हे नॉर्वेतील लोकप्रिय नाटककारांपैकी आहेत. त्यांनी ४० नाटके, कांदबरी, लघुकथा, बालसाहित्य, निबंध तसेच कविता असे विपुल साहित्य लेखन केले आहे. साहित्याचे नोबेल मिळवणारे जॉन हे नॉर्वेतील चौथे साहित्यिक आहेत. रोख रक्कम ११ दशलक्ष स्वीडिश क्रोनर आणि १८ कॅरेट सुवर्णपदक (gold medal) असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
(हेही वाचा – Sharad Ponkshe : ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ नाटकाला मुंबई उच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यास नकार)
या पुरस्कारबाबत भावना व्यक्त करताना ते म्हणाले की, गेल्या दहा वर्षांत असे घडू शकले नसते. समितीकडून फोन आल्यानंतर आनंद झाला. हा पुरस्कार आणि त्याची रक्कम या प्रथम उद्देश केवळ साहित्य आहे. त्यामुळे हा गौरव माझ्यासाठी विशेष आहे. त्यांना यापूर्वी १९०३ साली बिज्रस्टजर्न बज्रन्सन, १९२० मध्ये नट हॅम्सन, १९२८ ला सिग्रिड अंसेट यांना सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community