CM Eknath Shinde :एक फुल, एक हाफ यांनी आम्हाला शिकवण्याची गरज नाही” एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका

राज्याचा मुख्यमंत्री घरात बसून काम करू शकतो असं विधान करणाऱ्यांनी दुसऱ्याला शिकवण्याची गरज नाही.

149
CM Eknath Shinde :एक फुल, एक हाफ यांनी आम्हाला शिकवण्याची गरज नाही” एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
CM Eknath Shinde :एक फुल, एक हाफ यांनी आम्हाला शिकवण्याची गरज नाही” एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका

साधा नगरसेवकही घरात बसून काम करू शकत नाही. मग राज्याचा मुख्यमंत्री घरात बसून काम करू शकतो असं विधान करणाऱ्यांनी दुसऱ्याला शिकवण्याची गरज नाही. एक फुल, एक हाफ यांनी आम्हाला शिकवण्याची गरज नाही”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या पत्रकारपरिषदेत सरकारवर केलेल्या टीकेवर उत्तर देताना  केली. (CM Eknath Shinde)
नक्षलवाद्यांच्या संदर्भात करायवयाच्या उपाययोजना याबाबत चर्चा करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीत बैठक बोलवली होती. यावेळी ७ ते ८ राज्याचे मुख्यमंत्री आले होते, यावेळी माध्यमांशी संवाद साधताना शिंदे बोलत होते. कोरोना काळात मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार त्यांच्या सरकारमध्ये झालाय.

(हेही वाचा ; Chandrasekhar Bawankule : उद्धवा अजब तुझा कारभार म्हणत, बावनकुळेंनी केला पलटवार)

नांदेडमधील प्रकार दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. पण, यात राजकारण केलं जात आहे ते आणखी दुर्दैवी आहे. ज्यांना मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याची सवय लागली आहे. त्यांच्याकडून आपण अधिक काही अपेक्षा करु शकत नाहीत, असं प्रत्युत्तर शिंदे यांनी दिलं आहे. कोरोना काळात डेड बॉडी बॅगमध्ये पैसे खाल्ले, तीनशे ग्रॅम खिचडी १०० ग्रॅमला देवून पैसे खाल्ले, ऑक्सिजन प्लॅटमध्ये पैसे खाल्ले. हे बाहेर येत असल्याने लक्ष हटवण्यासाठी सीबीआयची मागणी केली आहे. ही मागणी चांगली आहे. यामध्ये कोरोना काळातील नक्की चौकशी होईल. औषधांची खरेदी चुकीच्या प्रकारे केली असेल तर त्याचीही चौकशी केली जाईल, असं मुख्यमंत्री म्हणाले. (CM Eknath Shinde)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.