जगातील २० देशांच्या संसदेचे संमेलन (पी-२०) देशाची राजधानी दिल्लीत आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहेत्र लोकसभेचे अध्यक्ष ओम बिरला यांनी शुक्रवारी (०६ ऑक्टोबर) रोजी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, जगातील २० देशांच्या संसदेचे एक संमेलन दिल्लीतील द्वारका येथील इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन अँड एक्स्पो सेंटर येथे आयोजित करण्यात आले आहे. १३ आणि १४ ऑक्टोबर असे दोन दिवस चालणाऱ्या संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. भारतात होणारे हे नववे संमेलन होय. (P-20 Summit)
जी-२० शिखर परिषदेत जे देश सहभागी झाले होते त्याच देशातील संसदेचे अध्यक्ष पी-२० संमेलनात सहभागी होणार आहेत. याशिवाय, १० इतर देश आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रतिनिधी सुध्दा या परिषदेत सहभागी होतील. आंतरराष्ट्रीय पार्लियामेंट युनियनच्या अध्यक्षांसह २६ अध्यक्ष, १० उपाध्यक्ष, ०१ समिती अध्यक्ष, ५० संसद सदस्य आणि १४ महासचिवांनी या संमेलनात सहभागी होणार असल्याचे लेखी स्वरूपात कळविले आहे. याशिवय पॅन आफ्रिकन संसदेचे अध्यक्ष प्रथमच भारतात होणाऱ्या पी-२० स्पर्धेत सहभागी होणार आहेत, असेही बिरला यांनी यावेळी सांगितले. (P-20 Summit)
(हेही वाचा – Shrikant Shinde : तुमच्या आणि माझ्या कमाईच्या स्त्रोतावर खुली चर्चा करू; श्रीकांत शिंदे यांचा पलटवार)
‘वसुधैव कुटुंबकम्-एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ हे ब्रिदवाक्य डोळ्यापुढे ठेवून भारताने अधिक समावेशक, शांततापूर्ण आणि न्याय्य जगाच्या दिशेने जागतिक महत्वाच्या समस्यांवर चर्चा करून सहमती आणि त्यावर उपाय शोधून काढण्याचा प्रयत्न पी-२० संमेलनात केला जाणार आहे. बिरला पुढे म्हणाले की, ‘पी-२०’ शिखर परिषदेदरम्यान चार उच्चस्तरीय सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. यात एसडीजी अजेंडा २०३०: उपलब्धी प्रदर्शित करणे, प्रगतीचा वेग वाढवणे, शाश्वत ऊर्जा संक्रमण: ग्रीन एनर्जी भविष्याचे प्रवेशद्वार, लैंगिक समानता, महिला सक्षमीकरण आणि महिलांच्या नेतृत्वाखालील विकास आणि सार्वजनिक डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे लोकांचे जीवन बदलणे असे चार सत्र होणार आहेत. (P-20 Summit)
जी-२० देशांना एका ठिकाणी आणून त्या देशांची संसद आपले उद्दिष्टे कशाप्रकारे प्रभावीपणे राबवू शकतात यावर व्यापक विचार विनिमय केला जाणार आहे. संमेलनाच्या शेवटी समता, सर्वसमावेशकता आणि शांतता यावर आधारित एक संयुक्त संयुक्त निवेदन जारी केले जाईल, असेही बिरला यांनी सांगितले. बिरला पुढे म्हणाले की, १२ ऑक्टोबर २०२३ रोजी शाश्वत विकासासाठी जीवनशैली शिखर परिषदेपूर्वी पर्यावरणासाठी जीवनशैलीवर आधारित सेमीनार आयोजित केला जाईल. याची सुरुवात २० ऑक्टोबर २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी गुजरातमध्ये केली होती. हा उपक्रम पर्यावरणाबाबत जागरूक जीवनशैली आणि ‘कमी, पुनर्वापर, पुनर्वापर’ या तत्त्वावर आधारित आहे. यावेळी ‘मदर ऑफ डेमोक्रसी’ प्रदर्शनाचे आयोजन केले जाणार आहे. (P-20 Summit)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community