बारामती तालुक्यातील तरडोली गावाचे उपसरपंच सागर जाधव यांनी अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. याशिवाय दुधाला दर मिळावा या मागणीसाठी उपसरपंच जाधव गेल्या पाच दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत.
आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मार्गदर्शनाखाली तरडोली ग्रामस्थांच्या वतीने पुणे-बारामती रास्ता रोको करण्यात आला. या रास्ता रोकोदरम्यान आंदोलक विजय भोसले यांनी अजित दादा, तुम्ही ७० लाख कोटी वाचवण्यासाठी भाजपसोबत गेलात आम्ही कोणाकडे जायचं? असा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केल्याने बारामतीत चर्चेचा विषय ठरला आहे.
आरोप करत उपसरपंच जाधव राग व्यक्त करत म्हणाले की, आम्ही कोणतेही काम पवार साहेबांकडे घेऊन गेलो, तर पवार साहेब सांगतात, राज्यातील सूत्र अजित पवारांकडे दिली आहेत. कोणत्याही गाव पुढाऱ्यांना विचारल्यावर म्हणतात, हे प्रश्न दादाच सोडवू शकतात, पण दादा आपला कुठलाच प्रश्न मार्गी लावणार नाहीत का , असा सवाल करून विजय भोसले या तरुणाने केला आहे. इतर तरुणांना सावध होण्याचा सल्ला दिला आहे. आज नरडीला आले आहे. दूध संस्था उचल देत नाही, म्हणत मनातली खदखद व्यक्त केली.
(हेही वाचा – Shrikant Shinde : तुमच्या आणि माझ्या कमाईच्या स्त्रोतावर खुली चर्चा करू; श्रीकांत शिंदे यांचा पलटवार )
याविषयी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना उपसरपंच जाधव म्हणाले की, बारामतीकरांनो, अजितदादांना मतदान करू नका, जिरायत पट्ट्यातील मतदार नाराज आहेत. आम्ही भाजपच्या कार्यकर्त्यांना गावात हस्तक्षेप करण्यापासून रोखले, मात्र आज आम्हाला भाजपचे पदाधिकारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खरे वाटतात आणि दादा तुम्ही खोटे वाटता. ७० लाख कोटी वाचवण्याऐवजी सत्तर लाख रुपये पुरंदर उपसाला सोडले असते, तर तळ भरलं असतं. गावातील पाण्याचा प्रश्न सुटला असता.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community