DRUGS : मुंबई पोलिसांची नाशिकमध्ये मोठी कामगिरी; ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश

मुंबई पोलिसांनी केलेल्या या कारवाईनंतर ड्रग विक्री करण्याचे मोठे रॅकेटच समोर येणार आहे.

110
DRUGS : मुंबई पोलिसांची नाशिकमध्ये मोठी कामगिरी; ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश
DRUGS : मुंबई पोलिसांची नाशिकमध्ये मोठी कामगिरी; ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश

मुंबईतील विविध ठिकाणी तसेच कल्याण आणि नाशिक येथे छापेमारी करून ३०० कोटी रुपयांचा एमडी हा अमली पदार्थासह १२ जणांना अटक करण्यात आली आहे. सकिनाका पोलीस ठाण्याकडून करण्यात आलेल्या या कारवाईत नाशिक एमआयडीसी येथे एमडी बनविण्याचा कारखाना उध्वस्त करण्यात आला आहे. (DRUGS)
अनवर अफसर सय्यद (४०),जावेद आयुब खान (२७),जावेद सय्यद,आसिफ शेख(३०), इकबाल मोहम्मद अली (३०),सुंदर राजन शक्तीवेल (४३) हसन सुलेमान खान (४०), आयुब सत्तार सय्यद (३२),आरिफ शेख,असमत अन्सारी,जिशान शेख असे अटक करण्यात आलेल्या ड्रग्स विक्रेत्यांची नावे आहेत. हे सर्व ड्रग्स विक्रेते धारावी,सकिनाका, शिळफाटा कल्याण आणि नाशिक परिसरात राहणारे आहेत.

साकीनका पोलीसांनी सप्टेंबर महिण्यात १० ग्रॅम एमडी या अमली पदार्थसह साकीनका परिसरातून अटक केली होती. त्यांच्या चौकशीनंतर अमली पदार्थचे रॅकेट सकिनाका पोलिसांनी उध्वस्त करून नाशिक येथील एमडी बनविणाऱ्या कारखान्यावर छापा टाकून जवळपास १५० किलो एमडी जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या एमडी ची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ३००कोटी रुपये किंमत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.नाशिक येथून संपूर्ण राज्यभरातील छोट्या ड्रग्स विक्रेत्यांना एमडीचा पुरवठा करण्यात येत होता अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

काही दिवसांपूर्वीच ड्रग्ज माफिया ललित पाटील आजारीपणाच्या कारणावरून येरवडात तुरुंगातून पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल झाला होता त्याचवेळी ससून रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ड्रग विक्री करताना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ललित पाटील याला रंगेहाथ पकडले होते पण त्यांच्या हातावरती तुरी देऊन ललित पाटील हा ससून रुग्णालयातून फरार झाल्याची घटना घडली. या प्रकरणानंतर ड्रग्ज विरोधी कारवाईसाठी पोलीस चांगलीच आले आहे.(DRUGS )

(हेही वाचा : Election Commission : आमदारांची संख्या महत्त्वाची, त्याआधारेच पक्ष कोणाचा ठरवता येईल; अजित पवार गटाने युक्तीवाद)

हेही पहा  –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.