नांदेड (Nanded hospital deaths) येथील शासकीय रुग्णालयात ४ दिवसांत झालेल्या ५१ रुग्णांच्या मृत्यूप्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली. त्यावर शुक्रवार, ६ ऑक्टोबर रोजी सुनावणी झाली तेव्हा न्यायालायने मागील सहा महिन्यांत शासकीय रुग्णालयातील रिक्त जागा भरण्यासाठी आणि औषधांची मागणीनुसार पुरवठा करण्यासाठी काय पावले उचलली याविषयाची माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे देण्याचा आदेश राज्य सरकारला दिला.
यावेळी न्यायालयाने वैद्यकीय साहित्य पुरवठा करणाऱ्या विभागालाही कायद्यानुसार औषध खरेदी, कर्मचारी नियुक्त आणि उपलब्ध कर्मचारी यांची माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे देण्याचा आदेश दिला. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रावर न्यायालय म्हणाले, प्रधान सचिवांनी प्रतिज्ञापत्रात मागील एक वर्षात नांदेडला (Nanded hospital deaths) वैद्यकीय साहित्य पुरवठा करणाऱ्या इतर संस्थांची माहितीही द्यावी. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांनीही अशीच माहिती द्यावी, असेही न्यायालयाने म्हटले.
न्यायालयाने कोणते मुद्दे केले उपस्थित?
औषध पुरवठा करण्यासाठी कोणती यंत्रणा अस्तित्वात आहे? रुग्णालयांना कशी औषधे मिळतात? रुग्णालयाच्या आतील आणि परिसरातील स्वच्छता कशी ठेवली जाते? आणि डॉक्टरांच्या किती जागा रिक्त आहेत? मंजूर डॉक्टर संख्या किती आहे, तज्ज्ञ डॉक्टरांची मंजूर संख्या किती आहे? अशी माहिती सादर करण्याचा आदेश न्यायालयाने दिला.
(हेही वाचा Dadar : दादरमधील अनधिकृत प्राणिसंग्रहालयात चाललंय काय? जलतरण तलावात अजगर, मगरीनंतर सावरकर स्मारकात धामण )
Join Our WhatsApp Community