मुंबई महापालिकेच्या स्थापत्य उपनगरे समितीच्या अध्यक्षपदी गोरेगावमधील शिवसेना नगरसेवक स्वप्निल टेंबवलकर यांची निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी सदानंद परब यांची निवड करण्यात आली आहे.
अशी झाली निवडणूक
स्थापत्य समिती(उपनगरे) अध्यक्ष पदासाठी गुरुवारी झालेल्या निवडणुकीत शिवसेना उमेदवार स्वप्निल मोहन टेंबवलकर यांना १८ मते मिळाली. तर प्रतिस्पर्धी भाजपच्या उमेदवार प्रतिभा हेमंत शिंदे यांना १३ मते मिळाली. या समितीमध्ये एकूण ३६ सदस्यांपैकी ३१ सदस्यांनी मतदान प्रक्रियेत भाग घेतला. ०५ सदस्य तटस्थ राहिले. त्यामुळे पिठासीन अधिकारी सुहास वाडकर यांनी टेंबवलकर यांना विजयी घोषित केले. उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार सदानंद वामन परब यांना १६ मते मिळवून ते विजयी झाले. तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार योगीराज नारायणराव दाभाडकर यांना १३ मते मिळाली.
(हेही वाचाः स्थापत्य शहर समिती अध्यक्षपदी दत्ता पोंगडे यांची निवड!)
शिवसेनेची दोन मते अवैध
एकूण ३६ सदस्यांपैकी ३१ सदस्यांनी मतदान प्रक्रियेत भाग घेतला. ०५ सदस्य तटस्थ राहिले. तर उपाध्यक्षपदाच्या या निवडणुकीत शिवसेनेची दोन मते अवैध ठरली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जेव्हा शिवसेनेच्या उमेदवाराला १८ मते मिळाली होती, तिथे उपाध्यक्षपदच्या निवडणुकीत शिवसेना उमेदवारला १६ मते मिळाली. त्यामुळे उपाध्यक्षाला दोन मते कमी पडली.
Join Our WhatsApp Community