Fire : गोरेगावच्या ‘त्या’ इमारतीच्या आगीचे नेमके कारणे काय?

134

गोरेगावमधील जय भवानी को.ऑप. हौसिंग सोसायटी या एसआरएच्या इमारतींमध्ये गुरुवारी उत्तर रात्री आगीची (Fire) घटना घडल्याने ७ रहिवाशांचा मृत्यू, तर ६२ जण जखमी झाले. या सर्व जखमींवर जोगेश्वरी ट्रॉमा केअर रुग्णालय, कुपर रुग्णालय, कस्तुरबा रुग्णालयासह खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहे. ही आग वीज मीटर कॅबिनमध्ये शॉर्ट सर्कीट झाल्यामुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, ज्याप्रकारे वीज मीटरच्या केबिनचा भाग पूर्णपणे न जळाल्याने प्रत्यक्षात ही आग शॉर्ट सर्कीटमुळे लागली की अन्य कुठल्या कारणामुळे असा प्रश्न आता निर्माण होऊ लागला आहे.

गोरेगाव पश्चिम येथील उन्नत नगर येथील आझाद मैदान परिसरात असलेल्या जय भारत एसआरए गृहनिर्माण संस्थेच्या सात मजली इमारतींमध्ये शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास आग (Fire) लागण्याचा प्रकार घडला. ही आग सकाळी सातच्या सुमारास नियंत्रणात आली. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान पोहोचण्यापूर्वी काही लोकांना इमारतीबाहेर काढण्यात आले. मात्र, या आगीमध्ये होरपरळल्याने धुराचा त्रास झाल्याने गुदमरल्याने सर्व जखमी झाले. त्यांना रुग्णालयांमध्ये दाखल केल्यानंतर जोगेश्वरीतील बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात सहा जणांचा आणि कुपर रुग्णालयात एकाचा मृत्यू झाला. तर उर्वरीत ५५ जणांची प्रकृती स्थिर असून पाच जणांची गंभीर आहे. दोन जणांना उपचार करून सोडून देण्यात आले असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.

(हेही वाचा Dadar : दादरमधील अनधिकृत प्राणिसंग्रहालयात चाललंय काय? जलतरण तलावात अजगर, मगरीनंतर सावरकर स्मारकात धामण )

या इमारतीच्या तळ मजल्यावर इलेक्ट्रीक मीटर बॉक्स असून त्याच्या शेजारी वाहनतळाची जागा आहे. या वाहनतळाच्या जागेवर मोठ्या प्रमाणात चिंधी कपड्यांचे गाठोडी विविध ठिकाणी बांधून ठेवण्यात आली होती. त्यामुळे आगीमुळे वाहनतळातील बाईकने पेट घेतल्यानंतर तेथील गाठोड्यांमधील कपड्यांमधून ही आग (Fire) वाढली गेली. काही अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ही आग मोठ्या प्रमाणात पसरली नाही, तर आगीमुळे धुराचे लोळ मोठ्या प्रमाणात पसरले. त्यात लिफ्ट ही कॉलॅपशिबल डोअरची असल्याने त्या लिफ्ट डकचा परिसर मोकळा असल्याने त्यातून हा धूर वरच्या दिशेला पसरला. त्यामुळे वरच्या मजल्यावर हा धूर पसरुन लोकांना त्रास होऊ लागला. त्यामुळे या धुराच्या त्रासामुळे अनेक रहिवाशांना याचा त्रास झाल्याने त्यांना जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले.

परंतु या तळघरातील वीज मीटर कॅबीनमधील शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असला तरी प्रत्यक्षात ही मीटर कॅबिनमुळे पूर्ण न जळाल्याने ही आग (Fire) नक्की कशामुळे लागली याबाबत आता शंका उपस्थित होत आहे. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून याची आता पुढील तपासणी केली जाणार असून त्यामुळे या आगीचे कारण शोधले जाणार आहे. त्यामुळे ही आग वीज मीटरमध्ये प्रथम लागली की त्या कपड्यांमुळे याचे निश्चित कारण स्पष्ट होईल, असे बोलले जात आहे.

दरम्यान, शुक्रवारी संध्याकाळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या इमारतीची पाहणी केली. या पाहणीदरम्यान नागरिकांना भेटू न दिल्यामुळे स्थानिक रहिवाशी संतप्त झाले होते. या इमारतीतील अन्य समस्या आम्हाला सांगायचे असून त्यासाठी आम्हाला मुख्यमंत्र्यांना भेटायचे होते, असे या स्थानिकांचे म्हणणे होते. तत्पूर्वी मुंबई शहराचे पालकमंत्री दिपक केसरकर आणि उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी घटनास्थळाची पाहणी करून रुग्णालयात जावून रुग्णांच्या प्रकृतीची चौकशी केली. महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इक्बालसिंह चहल, अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे, उपायुक्त विश्वास शंकरवार आदींसह अधिकारी वर्ग घटनास्थळासह रुग्णालयातील दाखल रुग्णांची प्रकृतीची काळजी घेत होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.