कोरोना काळात जे तोंडाला मास्क लावून घरात बसून फेसबुक लाइव्ह करत होते. त्यांना माझ्यासारख्या रस्त्यावर उतरून काम करणाऱ्यावर टीका करण्याचा अधिकार नाही. काेरोना काळात मी पीपीई किट घालून हॉस्पिटलमध्ये लोकांना मदत करत फिरत होतो. त्यावेळी हे घरात बसले होते. त्यांना भेटायला येणाऱ्यांची अँटिजेन टेस्ट करून दोन-दोन तास बसवून मग ते भेटत होते. अशा प्रकारचे मुख्यमंत्री या देशाने नाही तर जगाने पाहिले नसतील. एकीकडे कोरोनाने माणसं मरत होती आणि हे घरात बसून नोटा मोजण्याचे काम कर होते, असा पलटवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला.
उद्धव टाकरेंनी भ्रष्टाचाराच्या चौकशीची केलेली मागणी चांगली आहे. कारण त्यांच्या काळात कोविड घोटाळा झाला आहे. मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा जो प्रकार झाला तो समोर येईल. जे झाले ते वाईट झाले . मात्र ज्यांनी बॉडीबॅग, खिचडी, औषधांची खरेदी यात घोटाळा केला तो समोर येईल. नांदेडमधे औषध खरेदीत जर घोटाळा झाला असेल, हलगर्जीपणा झाला असेल तर त्यावर नक्की कारवाई होईल. नांदेड घटनेची सगळी चौकशी होऊ दे, दोषींना पाठीशी घालणार नाही, असे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community